Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘त्या’ झटणार्‍या हातांना ‘देशदूत’ चा सलाम

Share
‘त्या’ झटणार्‍या हातांना ‘देशदूत’ चा सलाम; Deshdoot Salutes those providing essential service

 

नाशिक । प्रतिनिधी

शहरात ‘करोनाचा शिरकाव होऊ नये’ म्हणून जिल्हाधिकारी, डॉक्टर, परिचारक, २४ तास औषधांचा पुरवठार करणारे मेडिकल दुकानातील सेवक, पोलीस यंत्रणा, स्वच्छता ठेवणारे सफाई कर्मचारी यासह कुठल्याही अफवांशिवाय जनतेपर्यंत इत्यंभूत सत्य माहिती पुरवणार्‍या माध्यमांच्या प्रतिनिधी यांच्या अव्याहात सेवेमुळे या मंडळींचे कार्य किमयागाराची भूमिका बजावत आहे. रोगापासून दूर ठेवणार्‍या या घटकाला देवदूत म्हणून सामन्यजनताही सलाम करत आहेत.

जगभर धुमाकूळ घालणार्‍या करोना संकटाशी नाशिककर यशस्वीपणे दोन हात करत आहेत. त्यात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य यंत्रणा, ग्रामिण व शहर पोलीस यंत्रणेसह सर्व दिवसरात्र झटत असून त्याची परिणीती म्हणजे ‘नाशिक’ अद्याप करोनामुक्त आहे. नाशकात करोनाचा फैलवा टाळण्यासाठी सर्व यंत्रणा ऑन ड्युटी २४ तास कार्यरत आहे.

अंंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, शॉपिंग माल्स ते अगदी पान टपर्‍यांपर्यंत सर्व बंद ठेवण्यात आले आहे. नाट्यगृहे, जीम, चित्रपटगृहे, जॉगिग टँ्रक, उद्याने हे देखील बंद करण्यात आले आहे. नाशिकमध्ये करोनाचे संकट येऊ नये यासाठी नाशिककर देखील प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत असल्याचे पहायला मिळते.

शहर व जिल्ह्यात एकही करोना बाधित रुग्ण आढळला नसून नाशिककरांच्या लढ्याला यश मिळत आहे. दरम्यान, अशा आणीबीणीच्या परिस्थितीतही सर्वसामान्य नागरीकांसह नाशिककारांना कर्तव्य म्हणून अत्यावश्यक सेवा काही घटकांकडून दिली जात आहे. यात पेपर विक्रेते, दुधविक्रेते, औषध विक्रेते, बस, रूग्णवाहिका, अत्यावश्यक साहित्य घेऊन येणारे चालक यांच्यासह बसवाहक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आधिकारी व कर्मचारी, टेलिफोन ऑपरेटर, भाजीपाला विक्रेते आणि ज्ञान अज्ञात घटकाचा समावेश आहे. या सर्वांना ‘देशदूत’ चा सलाम !

जिल्हाधिकारी फिल्डवर
शहरासह जिल्ह्यात करोनाचा रूग्ण आढळू नये, यासाठी जिल्हाधिकारी तत्पर आहेत. त्यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयातील ‘करोना’ विषाणू आजार विलगीकरण कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदांणे व डॉ. गुंजाळ आदी उपस्थित होते.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!