Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक महानगरपालिका : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उदघाटन

Share
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमाचे उदघाटन; Nashik Municipal Corporation inaugurates pulse polio vaccination campaign

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमाचे उदघाटन मा. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते झाले. मनपाच्या  डॉ. झाकीर हुसेन रुग्णालया मध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते बालकास डोस पाजून करण्यात आला.

या कार्यक्रमास मा.स्थायी समिती सभापती उद्धव निमसे,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नितीन रावते, प्रभाग सभापती सुमन भालेराव ,नगरसेविका समीना मेमन, अर्चना थोरात,शोभा साबळे,डॉ. दीपाली कुलकर्णी,माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.अजिता साळुंखे ,वैद्यकीय अधिकारी डॉ अनिता हिरे,डॉ. शैलेश लोंढे अधिसेविका संध्या सावंत,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी रुग्णालयातील पुरुष कक्ष,अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग , बालरुग्ण विभाग,नवजात शिशू विभाग, अतिदक्षता विभाग,शस्त्रक्रिया विभाग, प्रसुती विभाग आदी विभागांची पाहणी करून माहिती घेतली व मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विविध सूचना दिल्या.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!