Thursday, April 25, 2024
Homeनाशिकउमराणे येथे आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव

उमराणे येथे आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव

नाशिक । प्रतिनिधी

नाशिककरांचा जीवाभावाचा सखा दै. ‘देशदूत’ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्य महोत्सव अभियान सुरू झाले आहे. आज  (दि. १८ ) उमराणे (ता. देवळा) येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोग्य महोत्सव होणार आहे.

- Advertisement -

‘देशदूत’ने सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महिला आरोग्याची निकड लक्षात घेता देशदूतने आरोग्य महोत्सवाचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील २० ठिकाणी महिलांसाठी आरोग्य महोत्सव होत आहे. जिल्ह्यातील नामांकित नामको हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स विद्यार्थिनी व महिलांची विनामूल्य आरोग्य तपासणी करुन मार्गदर्शन करतील. उंची, वजन, रक्तदाब, रक्तातील साखर, बीएमआय, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, हाडांचे विकार, मान, पाठ, गुडघे, कंबरदुखी या तपासण्या यावेळी केल्या जाणार आहेत.

उमराणे येथील आरोग्य महोत्सवाच्या उद्घाटनासाठी सरपंच लताबाई देवरे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, जि. प. सदस्य यशवंतराव शिरसाठ, नामको बँकेचे संचालक कांतीलाल जैन, सुभाष नहार, पं. स. उपसभापती धर्मा देवरे, चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, माजी जि.प. सदस्य प्रशांत देवरे, माजी सभापती विलास देवरे, उपसरपंच शितल जाधव, उद्योजक कैलास देवरे, बाजार समितीचे संचालक गोरख पवार, प्रशासक सुजय पाटे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तालुक्यातील गरजुंनी आरोग्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आरोग्य महोत्सवाच्या ठिकाणीच बचत गटांची जत्राही आयोजित केली आहे. तालुक्यातील बचत गटांना यानिमित्त व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. बचत गटांच्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीही केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या