Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देशदूत कल्चर कट्टा: …लेकीन लहू का रंग एक है

Share
देशदूत कल्चर कट्टा: ...लेकीन लहू का रंग एक है ; Deshdoot Culture katta

नाशिक । प्रतिनिधी

हळूहळू हवेत वाढत जाणारा गारवा, फुलांनी वातावरणात भरलेली खुशबू, दिव्यांची रास, अत्तराची खुशबू आणि शामियाना शेजारी तेवणारी ‘शमा’, कलात्मक गुलाबदाणीतून दरवळलेला सुगंध आणि साथीला मखमली स्वरातून सादर झालेल्या जजबात, मोहब्बत, आरजू, देशभक्ती, मानवता, प्रेम या मानवी भावनांचे नजाकतीने प्रगटीकरण करणारे शायर, त्यांच्या अर्थपूर्ण शेरो-शायरी अन् गझला, मुशायरा……प्रखर होत जाणार्‍या ‘शमा’ची साक्ष आणि दर्दी रसिकांसमोर सादर झालेला मुशायरा, त्याला ‘इर्शाद, क्या बात है’ अशी दाद देणारे रसिक. अशा भारलेल्या वातावरणात ‘देशदूत’ आयोजित ‘महफिल-ए- मुशायरा’ला चार चाँद लागले. औचित्य ठरले ‘देशदूत कल्चर कट्ट्या’चे….!

देशदूत कल्चर कट्ट्याचे द्वितीय पुष्प शनिवारी (दि. ११) ‘महफिल-ए- मुशायरा’ या उर्दू शायरीने गुंफले गेले. खास सजवलेल्या बिछायतीवर शायरा रईसा खुमार आरजू, अफसर खान अफसर, जमीर पठाण जमीर, अझरोद्दीन जाहीर, इर्शाद वसीम, सज्जाद हैदर आणि असिफ अहमद आसिफ यांनी शायराना अंदाजाचा कळस गाठत ‘महफिल’मध्ये अनोखे रंग भरले.

ढुंढनेसे खुदा भी मिलता है
हमने किही नही कोशिशकुछ
बात बनना, ना बनना अपनी जगह
आखिर करे देखो तो तूम सही कोशीश ही तूम..

प्रयत्नांचे महत्त्व पटवणार्‍या अशा आशयपूर्ण गझलाने मुशायराचा प्रारंभ असिफ अहमद आसिफ यांच्या शायरीने झाला.

त्यानंतर अझरोद्दीन जाहीर यांंनी:
जो किसीसे वफा करता नही, मै कभी उसे मिला करता नही
आँधीयोंसे से डर रहा है दिया, वो अंधेरा जला करता नही
जिसके दिलोंमे खौफ है अल्लाह का, दुनियासे डरा करता नही..
असे शेर नजाकतीने सांगून कार्यक्रमात रंगत आणली.

जमीर पठाण जमीर यांनी आपल्या शायरी, गझलांमध्ये जीवनातील वास्तवाचे विविध पैलू सुरेखपणे उलगडले.

सच्चाई सब के सामने लाने तुला है
भोला है कितना नादान है वह शक्स
दुनिया की तरिकोसे अंजान है शक्स
अब कर चुका है अज्मर कि बन जाये नेक
जब चंद दिनो का मेहमान है शक्स..
अशा पद्धतीने त्यांनी जीवनात हेवेदावे, द्वेष, सर्व चूक असून या जगात माणसाचे अस्तित्व छोटे आहे, ही क्षणभंगूरता गझलमधून मांडली. पठाण यांनी गायकी अंदाजाने सादर केलेल्या ‘लहू का रंग एक है सब’ गझलला उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रतिसादात दाद दिली.

इर्शाद वसीम यांनी आपल्या शायरीतून, दु:ख झेलणार्‍या तरीही चेहर्‍यावर आनंद, हास्य आणणार्‍या मनुष्याला योग्य ‘फनकारा’ची उपमा देत जीवनाच्या सत्यतेवर अचूक बोट ठेवले.

बुढे दरख्त कोई अब पुछता नही
फल देने वाला जब शजर खत्म हो गया
वो अपनी कामयाबी पे इतराहा था पर
सुन के मेरी खुशी की खबर खत्म हो गया
मौत आयी तो चैन उसे मिल गया वसीम
अब उसकी आंसू का सफर खत्म हो गया……
वयस्कांच्या जीवनावर अचूक भाष्य करत त्यांनी वार्धक्यानंतर येणारा मृत्यू अश्रूचा प्रवास संपवतो हे शाश्वत सत्य, सुरेख शायराना अंदाजात सादर केले.

त्यानंतर रईसा खुमार आरजू यांनी प्रेमाचा बहारदार प्रत्यय आपल्या सजलेल्या गझलांमधून व्यक्त केला. प्रेमाच्या गझला त्यांनी नजाकतीने सादर करत वाह क्या बात है…ची दाद मिळवली.
तुम्हारी राह मे पलके बिछाए बैठे है
धडकते दिलों की तमन्ना का इंतजार हो तूम..
अशा हृदयाला अलवार स्पर्श करणारे शेर सांगून रईसा यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. अफसर खान अफसर यांच्या अर्थपूर्ण आणि बोधप्रद शायरीने कार्यक्रमाला उंचीवर नेऊन ठेवले.

सज्जाद हैदर यांनी
ये सदी जीस को तरक्की की इंतेहा कहीये
सुकुन व चैन की दौलत नही देने वाली
इस रग रग मे सुलगता हुवा लावा बह रहा है
ये किसी को भी मोहब्बत नही देने वाली..
अशा शायरी अचूक जागी पेरून महफिलीला साजेसे निवेदन केले.

प्रारंभी ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनीं प्रास्ताविकात नाशिकच्या मातीतील कलाकारांच्या कलेला सशक्त व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने ‘देशदूत कल्चर कट्टा’ उपक्रमाचा प्रारंभ केल्याचे सांगितले. मान्यवरांचे स्वागत ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा, संचालक रामेश्वर सारडा व रिद्धी सारडा यांनी केले. रईसा खुमार आरजू रचित शायरीच्या पुस्तकांचे प्रकाशन ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘देशदूत’चे संचालक जनक सारडा, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, आ. देवयानी फरांदे, नगरसेविका आशा तडवी, समीना मेमन, नगरसेवक मुशीर सय्यद, सलीम शेख, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी आदी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!