Thursday, May 2, 2024
Homeनाशिकलाचखोर कृषी उपसंचालक जाळ्यात

लाचखोर कृषी उपसंचालक जाळ्यात

नाशिक । प्रतिनिधी

शेतकर्‍यांचे द्राक्ष निर्यातीसाठी फायटो परवाना देण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची लाच घेणार्‍या कृषी उपसंचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सायंकाळी रंगेहाथ जेरबंद केले.

- Advertisement -

नरेंद्र आघाव असे पकडण्यात आलेल्या कृषी उपसंचालकाचे नाव आहे. तक्रारीवरून मंगळवारी (दि.३) सायंकाळी कृषी विभागाच्या कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

द्राक्ष निर्यातदारांना द्राक्ष निर्यातीसाठी फायटो परवाना आवश्यक असतो. त्यासाठी द्राक्षनिर्यातदारांनी कृषी विभागाकडे परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी कृषी अधिकारी आघाव यांनी परवाना देण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली.

याबाबत आघाव यांच्याविरोधात नाराजीचा सुर होता. तसेच त्यांच्याविरोधात तक्रारी देखील करण्यात आल्या. आघाव यांनी तक्रारदारांकडे १ लाख ६४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड करुन दीड लाख रुपये घेण्यास आघाव तयार झाले.

तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली. विभागाने तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला. त्यानुसार आघाव यांना लाचेची रक्कम स्विकारताना विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या