Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय

Share
नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय; Decision to strengthen the Directorate of town council Administration

मुंबई | प्रतिनिधी 

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आकृतीबंध सुधारित करून बळकटीकरण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार संचालनालयाच्या २७४ पदांच्या प्रचलित आकृतीबंधातील १३८ पदे निरसीत करून ५५० पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. या आकृतीबंधानुसार १०८ पदे मुख्यालयस्तरावर, ११७ पदे विभागीय स्तरावर आणि ३२५ पदे जिल्हास्तरावर असतील. सहआयुक्त व उपायुक्त या वरीष्ठ पदावर संचालनालय व मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल.

राज्यात सध्या २४० नगरपरिषदा व १२९ नगरपंचायती अशा एकूण ३६९ नागरी स्थानिक संस्था कार्यरत असून, नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत या संस्थाचे संनियंत्रण करण्यात येते. यामध्ये गुणात्मक सुधारणा होण्यासाठी बळकटीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!