Type to search

Featured maharashtra नाशिक

यंदा सायकलवारीत सातशे सायकलिस्टचा सहभाग

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन आयोजित सायकलवारीत यंदा सातशे सायकलिस्टचा समावेश असून दि. २८ ते ३० जून दरम्यान ही सायकलवारी पंढरपूरपर्यंत जाणार आहे.

कॅन्सर व लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार हा या वर्षीच्या वारीचा सामाजिक आशय असून त्यावर जनजागृती केली जाणार आहे. शिक्षण साहित्य संस्कृती आरोग्य सामाजिक एकता हे या वारीचे वैशिष्ट्य असून यंदाच्या वर्षी सातशे महिला पुरुष आणि मुले या सायकल वारीत सहभागी होणार आहेत.

यात शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक, पोलीस दल व साहित्यिक क्षेत्रातील नामवंत सहभागी होत असतात. त्यासाठी दररोज १० ते १५ किलोमीटर सायकल चालवण्याचा सराव सुरू आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एक वेगळा सामाजिक संदेश देण्यासाठी जिल्ह्यातील सायकल वारकरी या वारीत सहभागी होणार आहेत. शिक्षण, आरोग्य, संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचे दर्शन या वारीतून मिळत असून सर्व जातीधर्माचे सायकलिस्ट यात मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात.
-प्रवीण खाबिया, अध्यक्ष  सायकलिस्ट असोसिएशन

यंदाच्या सायकलवारीचे  वैशिष्ट्ये 
कॅन्सर आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती.
शून्य कचरा, शून्य प्लास्टिक.
खेडलेकर महाराज पटांगणात सायकल रिंगण.
वयवर्षे ८ पासून ७३ वर्षीय वारकरी सहभागी.
नाशिकसह मुंबई, पुणे, ठाणे, पुुणे शहरातून येणार सायकल वारकरी.
सदैव तत्पर सेवेत वैद्यकीय व्यवस्था.
महिलांची संख्या लक्षणीय.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!