Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

अस्थिरोग संघटनेची परिषद ‘नाशिकॉन-२०२०’

Share
अस्थिरोग संघटनेची परिषद ‘नाशिकॉन-२०२०’ ; Council of Orthopedics 'Nashikon-2020'

नवीन नाशिक । प्रतिनिधी

नाशिक अस्थिरोग संघटनेची चौथी दोन दिवसीय वार्षिक परिषद ‘नाशिकॉन-२०२०’ हॉटेल एक्स्प्रेस इन येथे झाली.परिषदेत उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघर, अहमदनगर, औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील अस्थिरोग तज्ज्ञांनी उपस्थिती नोंदवली. यावेळी भारतातील नामवंत अस्थिरोग तज्ज्ञांनी व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, व्हिडिओद्वारे प्रात्यक्षिके दाखवली. यावेळी भारतीय अस्थिरोग संघटनेचे आगामी अध्यक्ष डॉ. शिवशंकर, डॉ. वासुदेव गाडेगोणे, मुंबईतील नामवंत अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनंत जोशी, डॉ. हरिष भेंडे, डॉ. राम चढ्ढा, डॉ. संगीत गव्हाले, पुण्यातील डॉ. सचिन तपस्वी, डॉ. हेमंत वाखणकर, डॉ. संपत डुमरे-पाटील उपस्थित होते.

यावेळी आयोजित चर्चासत्रात डॉ. ऋतुजा मेहता, डॉ. हर्षिता नहाटा, डॉ. तन्वी सूर्यवंशी, डॉ. उत्कर्षा काकतकर, डॉ. चासनाल राठोड या महिला अस्थिरोग तज्ज्ञांनी सहभाग घेतला. अस्थिरोग क्षेत्राशी संबंधित फ्रॅक्चर, मणके विकार, सांधेरोपण शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, हॅण्ड सर्जरी या विषयांवर जागतिक पातळीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करण्यात आले.

ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विजय काकतकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नाशिकमधील डॉ. संजय गणोरकर, डॉ. भारत केळकर, डॉ. तुषार देवरे, डॉ. अमित वराडे, डॉ. हर्षद आढाव, डॉ. उमेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. नाशिक अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे, सचिव डॉ. नीलेश शेलार, डॉ. संजय धुर्जड यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. नितीन हिरे, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. सत्यम जोशी, डॉ. ब्रिजभूषण महाजन, डॉ. विलास देशमुख यांनी प्रयत्न केले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!