चांदवड : मालसाने येथे भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे अधिवेशन व विविध कार्यक्रम

उमराणे |  वार्ताहर

भारतीय दिगंबर जैन महासभेचे चाळीस वर्षापासून अध्यक्ष असलेले निर्मलकुमार सेठी हे असामान्य व्यक्तिमत्व आहे त्यांचे कार्य अलौकिक असे आहे त्यांनी जैन समाजाची मोठी सेवा केली आहेत त्यांच्यामुळेच अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास झाला जीर्णोद्धार झाला त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘सजग प्रहरी’ म्हणून पदवी बहाल करीत आहेत असे प्रतिपादन राष्ट्रसंत आचार्यश्री देवनंदी जी महाराज यांनी णमोकार तीर्थ येथे केले

णमोकार तीर्थ मालसाने तालुका चांदवड येथे  भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे  १२५ व्या स्थापना दिवसानिमित्त अधिवेशन व  विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ,ह्या निमित्ताने निर्मलकुमार यांना सलग चाळीस वर्ष राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले व उत्कृष्ट कार्य केले म्हणून ४० फुट लांब शाल व हार देऊन श्री दिगंबर जैन युवा महासभा नांदगाव यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले ,याप्रसंगी महिला दिनानिमित्त ४० महिलांना शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच णमोकार तीर्थ मालसाने तीर्थ ट्रस्ट कमिटी ,श्री मांगीतुंगीजीट्रस्ट कमिटी ,श्री अंजन गिरी ट्रस्ट कमिटी ,ज्ञानतीर्थ ट्रस्ट कमिटी, चंद्रगिरी तीर्थचांदवड ट्रस्ट कमिटी ,विदर्भ महासभा ,मराठवाडा महासभा आदि विविध ४० स्थांतर्फे शेठी यांचा सन्मान करण्यात आला १२५ वर्ष महासभेच्या स्थापना झाल्याबद्दल १२५ वृक्षांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले १२५ युवकांनी महासभाकार्याची शपथ घेतली रात्री १२५ दिपानी श्री चंद्रप्रभु भगवान यांची महाआरती करण्यात आली , महिलादिनानिमित्त ब्र ,वैशाली दीदी व सुवर्णा काला यांचा श्राविका रत्न पुरस्काराने महासभेतर्फे सन्मानित करण्यात आले.

मराठवाडा अध्यक्ष प्रकाश कासलीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रम प्रारंभ करण्यात आला ,कु मयुरी पाटणी मंगलाचरण व प्रीती लोहाडे स्वागतगीत व जमनालाल हेपावत यांच्या हस्ते मगलकलश स्थापना करण्यात आली , नूतन कासलीवाल यांच्या हस्तेआचार्य शांतीसागर जी महाराज, कुथूसागर महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण व पूजन कांयसभेची सुरुवात करण्यात आली भरत काला यांनी प्रास्ताविक केले नीलम अजमेरा ,सुमेरचंद काला संतोष पेंढारी महावीर गगवाल,महावीर ठोले, पवन पाटणी संतोष काला, ज्योती पाटणी, अर्चना कासलीवाल, जमनानालाल हेपावत, संदीप जैन, पारस लोहाडे, डी ऐ पाटील, बाबूभाई गांधी, डी बी पहाडे, अनिल जमगे डॉ कल्याण गगवाल,संतोष झवेरी, ललित पाटणी,भूषण कासलीवाल,यांची भाषणे झालीत संजय पापडीवाल, पियुष काला, नूतन कासलीवाल,आनंद काला, शैलेंद्र कासलीवाल, प्रवीण पहाडे, उपेंद्र लाड ,राजेंद्र कासलीवाल,आदी उपस्थित होते.

महासभेत ७ प्रस्ताव सर्वानुमते मंजुर

१ भारत सरकार जैन धर्मावर शोध कार्य करण्यासाठी शोधसस्था बनवावी

२ जैनधर्माची प्राचीन मंदिरांचे संरक्षण व्हावे ह्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी ना शासनाला निवेदन दयावे

३ महासभेस १२५ झाल्याबद्दल १२५ जैन मंदिराचे जीर्णोद्धार करणे

४ आर्ष परंपरा वाढावी ह्यासाठी विद्वान तयार करणे

५ स्पॅनिश अरबी आदी विविध भाषेत जैन साहीत्य छापून प्रचार व प्रसार करणे

६ विदेशात जैन धर्माचा प्रसार करणे

७ जैन धर्माचा सल्लेखना म्हणजे समाधीमरण विषयावर ग्रंथ तयार करून इतर समाजाला मह्त्व कळवणे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *