Friday, April 26, 2024
Homeनाशिकडांगसौदाणे येथे शिवणकाम प्रशिक्षणाचा समारोप

डांगसौदाणे येथे शिवणकाम प्रशिक्षणाचा समारोप

नाशिक | प्रतिनिधी 

डांगसौदाणे येथे खास महिलांसाठी  यशोदाबाई भामरे या बहु उद्देशीय संस्थेकडून शिवणकामाचे एक महिना प्रशिक्षण देण्यात आले .आजच्या बेभरवशाच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या वातावरणात एक पाऊल पुढे टाकत खास महिलांसाठी ‘मीच माझ्या जीवनाची शिल्पकार’ म्हणत महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी ब्लाऊस,पंजाबी ड्रेस ,वन पीस, नववारी साडी ,कल्पना साडी तयार करण्याचे प्रशिक्षण सविता विश्वंभर आणि संतोष विश्वंभर याच्या मार्गदर्शनाने देण्यात आले.

- Advertisement -

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सपना बोरसे यांनी केले तर पूनम सोनवणे आणि दिव्या बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या प्रशिक्षणाचा समारोप  आज करण्यात आला.  यावेळी महिलांनी महिन्याभरात शिवलेले  विविध प्रकारची ब्लाऊज ड्रेस, वन पीस साडीचे प्रकार कार्यक्रमात खास आकर्षणाचा भाग ठरली.

यावेळी या संस्थेचे अध्यक्ष शांताराम भामरे आणि संस्थेच्या सचिव प्रतिभा भामरे ,तसेच कातरवेल येथील ग्रामसेविका ललिता भामरे डांगसौदाणे गावातील तुळजा एज्युकेशन चे संस्थापक संजय सोनवणे ,विजय सोनवणे सरपंच जिजाबाई पवार,उपसरपंच वैशाली भदाणे  तसेच असंख्य महिलांनी यांनी उपस्थिती दर्शविली

- Advertisment -

ताज्या बातम्या