Thursday, May 9, 2024
Homeनाशिकसहकारी गृहनिर्माण संस्थांनी खबरदारीचे उपाय योजावेत – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

सहकारी गृहनिर्माण संस्थांनी खबरदारीचे उपाय योजावेत – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सूचना

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

प्रत्येक सहकारी संस्थानी गृहनिर्माण संस्थेच्या गेटजवळ सॅनीटायझर ठेवून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्याचे सांगावे. इंटरकॉमद्वारे प्रत्येक सदस्यास आवश्यक असणाऱ्या किराणा, भाजीपाला इत्यादी गोष्टीची मागणी एकत्रित करावी व त्यानुसार जवळच्या ठिकाणाहून किराणा व भाजीपाला आदी जीवनावश्‍यक वस्तू मागवून घेणे. प्रत्येक घरातील एक सदस्यास बोलावून गेट वरच त्याचे वाटप करावे, मात्र हे करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

संस्थेचे सदस्य तातडीचे न टाळता येणाऱ्या कामाशिवाय बाहेर जाणार नाहीत याची दक्षता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. तसेच सोसायटीचे क्लब हाऊस, बगीचा येथे सदस्य किंवा लहान मुले एकत्र येणार नाहीत याबाबत योग्य ती दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाय योजावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या