Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

चांदवड मतदार संघ दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री

Share

देवळा | प्रतिनिधी 

सततचा दुष्काळी असलेला चांदवड मतदार संघ दुष्काळमुक्त करण्याबरोर येत्या पाच वर्षात नार – पार प्रकल्प करु व कोणत्याही परिस्थितीत कांद्याचे भाव पडू दिले जाणार नाहीत अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री ना, देवेँद्र फडणविस यांनी दिली. ते चांदवड येथे चांदवड — देवळा विधासभा मतदार संघातील भाजपा – शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. राहूल आहेर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते, तर या मतदार संघातून तुम्ही एका सत्तारुढ पक्षाच्या आमदाराला नव्हे तर कदाचित या राज्याच्या भावी मंत्र्याला  निवडून देण्याचा मान मिळवाल, खासदार डॉ. भारतीताई पवार यांच्या पेक्षा किमान एक हजार मते जर जास्त दिलीत तर डॉ, राहूल आहेर हे मंत्री होतील असेही मुख्यमंत्री ना, देवेंद्र फडणविस यांनी यावेळी सांगत आमदार डॉ. राहूल आहेर यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केले.

यावेळी माजी जिल्हा परीषद सभापती ज्योती माळी यांनी शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.चांदवड येथील बाजार समिती सेल हॉल मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर खासदार डॉ. भारती पवार, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल, माजी खासदार प्रताप दादा सोनवणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागुल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा गटनेते आत्माराम कुंभार्डे, चांदवड बाजार समितीचे उपाध्यक्ष नितिन आहेर, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, विलास ढोमसे, नितिन गांगुर्ड, सुनिल शेलार, गणेश ठाकूर, डॉ. राजेंद्र दवंडे, प्रभाकर ठाकरे, शांताराम भवर, प्रमोद पाटील, पंढरीनाथ खताळ, इंदूमती ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

चांदवड व देवळा तालुक्यातील महायुतीतील सर्व तालुका अध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.यावेळी चांदवड व देवळा तालुक्यातील भाजपा, शिवसेना,आर पी आय,रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती, एकलव्य संघटनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्तिकेंद्र प्रमुख,शाखा प्रमुख, गटप्रमुख, विभागप्रमुख, तसेच महीला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!