Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘नासाका’बाबत मुख्यमंत्री सकारात्मक- आ. सरोज अहिरे

Share
‘नासाका’बाबत मुख्यमंत्री सकारात्मक- आ. सरोज अहिरे; CM positive about 'Nasaka'- Saroj Ahire

देवळाली कॅम्प । वार्ताहर

गेल्या सात वर्षांपासून बंद असणारा नाशिक सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर सुरू करावा, यासाठी मंत्रालय पातळीवर प्रयत्न व्हावे, यासाठी आ. सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

१२५० मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला, चार तालुक्यांतील हजारो शेतकर्‍यांच्या मालकीचा नासाका जिल्हा मध्यवर्ती बँकेने ८४.५० कोटी मुद्दल व त्यावरील २१.५० कोटी व्याज असे १०६ कोटी रुपये थकीत झाल्याने ताब्यात घेऊन भाडेतत्वावर चालविण्यास देणेबाबत कार्यवाही सुरू केली आहे.

कारखान्याकडे शासकीय देणी, सेवक देणी असे थकीत झाले असून कारखाना बंद असल्याने चार तालुक्यांतील शेतकर्‍यांचा ऊस गाळपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने यात हस्तक्षेप करून कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू झाल्यास कार्यक्षेत्रातील सभासदांना दिलासा मिळेल.

या कामी मंत्रालय स्तरावर जिल्हा बँक, अवसायक, साखर आयुक्त कार्यालय यांची संयुक्त बैठक होणे गरजेचे असल्याचे आ. अहिरे यांनी पटवून दिले. याबाबत शासन निश्चितच प्रयत्न करेन व शेतकर्‍यांना दिलासा  देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!