Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हुतात्मा एक्सप्रेसच्या मार्गात बदल

Share
हुतात्मा एक्सप्रेसच्या मार्गात बदल; Changes in the route of the Hutatma Express

नाशिकरोड । प्रतिनिधी

भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस दि.१६ ते २० जानेवारीपर्यंत नाशिकरोड ऐवजी मनमाड-दौंड मार्गे भुसावळहून पुण्याला आणि पुण्याहून भुसावळला जाणार आहे. दक्षिण पूर्व घाटात पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे. त्यामुळे या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आल्याचे रेल्वेने कळविले आहे.

मध्य रेल्वेने २० जानेवारीपर्यंत कर्जत आणि मंकी हिल दरम्यान रेल्वे रुळाचे काम हाती घेतले आहे. खचलेला रेल्वेमार्ग बदलण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरु आहे. गेल्या १ नोव्हेंबरपासून भुसावळ-पुणे एक्सप्रेस मनमाड-दौंड मार्गे भुसावळहून पुण्याला आणि पुण्याहून भुसावळला अडीच महिन्यापासून ती नाशिकला येत नसल्याने  पुण्याला स्वस्तात आणि वेळेत जाण्यासाठी नाशिककरांनी थेट दुसरी गाडी नाही. त्यांना चौपट भाडे मोजून एसटी किंवा खासगी वाहनाने जावे लागत आहे. त्यामुळे संपात व्यक्त होत आहे.

दि. १५ जानेवारीपर्यंत ती नाशिकमार्गे धावणार नाही हे आधीच जाहीर झाले होते. आता हुतात्मा एक्सप्रेस २० जानेवारीपर्यंत नाशिकमार्गे धावणार नाही.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!