नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यवसायिकांना केंद्र सरकार मार्फत मदत द्यावी- खा. डॉ. भारती पवार

नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यवसायिकांना केंद्र सरकार मार्फत मदत द्यावी- खा. डॉ. भारती पवार

नाशिक । प्रतिनिधी

करोना व्हायरसच्या संसर्गामुळे होणारा कोविड-१९ हा आजार चिकन खाण्यामुळे होत असल्याची चुकीची अफवा पसल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडला आहे.त्यामुळे संबंधित विभागाकडून नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यवसाय धारकांना मदत जाहीर करण्यात यावी,अशी मागणी खासदार डॉ.भारती पवार यांनी संसदेत अध्यक्षांच्या माध्यमातून संबंधित मंत्रालयाला केली.

चुकीची अफवा पसल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात पोल्ट्री फॉर्म हा मोठा व्यवसाय आहे.परंतु,सध्याच्या काळात चिकनबाबत काही चुकीच्या अफवा पसरवण्यात आलेली असल्याने लोकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. पोल्ट्री व्यवसाय हा संकटात सापडला आहे.खरं बघायला गेलं तर करोना या विषाणूचा चिकनशी कुठलाही प्रकारचा काहीही संबंध नसताना देखील चिकन खान्यासंदर्भात चुकीची अफवा पसरविण्यात आलेली आहे.

या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांना आधार व्हावा, याकरिता खासदार डॉ.पवार यांनी संसदेत अध्यक्षांच्या माध्यमातून संबंधित मंत्रालयाला विनंती केली आहे की लवकरात लवकर नोटिफिकेशन जाहीर करून संबंधित विभागाकडून नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यवसाय धारकांना मदत जाहीर करण्यात यावी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com