Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सोमवारी,शुक्रवारी अधिकारी, सेवकांनी मुख्यालयीच थांबावे- जि.प.अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर

Share

 

नाशिक । प्रतिनिधी

शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र, जिल्हा परिषद मुख्यालयासह पंचायत समितीस्तरावर अधिकारी व सेवक कार्यालयात हजरच राहत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झालीआहे.याची तात्काळ दखल घेत सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आठवडयाच्या सोमवारी व शुक्रवारी मुख्यालयी थाबावे.या दोन्ही दिवशी बैठका,व्हीसी ठेवू नये,अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी विभागप्रमुखांसह अधिकार्‍यांना केल्या आहेत.

जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये हजर राहून कार्यालयीन कामकाज करणे तसेच जिल्ह्यामधून येणार्‍या सर्व अभ्यागतांना भेटणे त्यांच्या अडीअडचणीचे निवारण करणे याबाबतचे शासन आदेश आहेत.मात्र,बरेच खातेप्रमुख,अधिकारी वृदं सोमवार-शुक्रवार या दिवशी जिल्हा परिषद मुख्यालयी तसेच पंचायत समिती मुख्यालयी हजर राहत नाहीत,असे निदर्शनास आले आहे.बैठकांना गेल्याचे सर्रासपणे सांगितले जाते.अथवा आपली पूर्वपरवानगी न घेता कार्यालयामध्ये अनुपस्थित राहतात.त्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये अडचणी येतात.

ग्रामीण भागातून अनेक पदाधिकारी व नागरीक दूरवरुन विकास कामांच्या पाठपुराव्यांसाठी येतात. मात्र, अधिकार्‍यांची भेट न झालेमुळे त्यांचे निवारण होत नाही.याबाबत अनेक तक्रारी पदाधिकारी व जि.प. सदस्याकडून प्राप्त झालेल्या आहेत. तरी आपण आपले स्तरावरुन सर्व खातेप्रमुख, अधिकारी व सेवकांना आठवडयाचे प्रत्येक सोमवार व शुक्रवार या दिवशी कोणत्याही व्ही.सी. किंवा विषय समिती बैठका व इतर आढावा बैठका आयोजित न करता या दिवशी सर्व अधिकारी व सेवकांनी मुख्यालयीच थांबून जनतेच्या कामकाजाविषयी सहकार्य करावे,तशा संबिधीतांना सक्त सूचना द्याव्यात.यांचे पालन न झाल्यास संबंधितावर प्रशासकिय कारवाही करण्यात येईल,याबाबतची समज द्यावी.व तशी कार्यवाही करावी,अशा सूचनाही अध्यक्ष क्षिरसागर यांनी विभागाप्रमुखांसह प्रशासनाला दिल्या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!