Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबागलाण कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना खते व बियाणे बांधावर देण्याचा उपक्रम

बागलाण कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना खते व बियाणे बांधावर देण्याचा उपक्रम

प्रतिनिधी ! डांगसौंदाणे

बागलाण कृषी विभागाने करोनाचे संकट लक्षात घेता शेतकऱ्यांना खते व बियाणे बांधावर देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात नुकतीच तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये करण्यात आली असून डांगसौंदाणे येथील श्री समर्थ कृषी सेवा केंद्रात या योजनेचा शुभारंभ मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

- Advertisement -

खरीप हंगाम लवकरच सुरू होण्याची आशा असताना पहिल्या पावसानंतर पेरणीच्या हंगामाला सुरुवात होते. यावेळी कृषी सेवा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते ही गर्दी टाळता येणे शेतकऱ्यांसाठी शक्य असल्याने शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे देण्याचा यशस्वी उपक्रम तालुका कृषी विभागाने हाती घेतला आहे. तालुक्यातील सर्व कृषी परवानाधारक व्यवसायिकांना याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या असून गर्दी न करता शेतकऱ्यांना योग्य ती खते व प्रमाणित बियाणे विक्री करण्याचे आदेश तालुका कृषी विभागाने दिले आहेत.

या योजनेचा शुभारंभ डांगसौंदाणे येथील समर्थ कृषी केंद्रात करण्यात आला यावेळी मंडळ कृषी अधिकारी व्ही. डी. ह्याळीज ,आर. एन. चव्हाण ,कृषी सहाय्यक रवी कांबळे, एस एस चव्हाण ,आदी सह शेतकरी उमेश सोनवणे, सोपान सोनवणे,पंडित गायकवाड़ बूंधाटेच्या सरपंच निर्मला साबळे कृषि केंद्राचे संचालक गंगाधर केल्हे आदि उपस्थित होते. दरम्यान चा.पाड़े बागलाण येथे सोयाबीनचे घरगुती बियाणे प्रत्यक्षिक उगवन क्षमता तपासणी करण्यात आली 76% उगवन क्षमता असलेले घरगुती बियाणे हे उत्तम प्रतिचे ठरत असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांनी गटागटाने नोंदणी करीत आपली खरीपाची खते व बियाणे नोंदणी करुण मागवल्यास मार्केट मधे होणारी गर्दी टाळता येइल परिणामी कोरनाच्या प्रादुर्भावाचा सामना शेतकऱ्यांना करण्याची वेळ ही येणार नाही व घरपोहच बियाणे व खते उपलब्ध् होतील.
सुधाकर पवार; कृषी अधिकारी बागलाण .
Attachments area

- Advertisment -

ताज्या बातम्या