Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्हा रुग्णालयात अनावश्यक गर्दी टाळा

Share
सिव्हिलमधून फरार झालेल्या संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह : डॉ. सैंदाने

केवळ अत्यावश्यकच सेवा देणार; करोना पार्श्वभूमीवर निर्णय

 

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालयात करोनाचा विलगीकरण कक्ष आहे. या ठिकाणावरून इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालयाने केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून रुग्णालयात इतर कागदपत्रे घेण्यासाठी अगर नातेवाईकांनी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी केले आहे.

जिल्ह्यात देश-विदेशातून येणार्‍या करोना संशयित रुग्णांवर उपचार व तपासणी जिल्हा रुग्णालयातील करोना कक्षात करण्यात येते. त्यामुळे अनपेक्षितपणे करोना व्हायरस रुग्णालयातून बाहेर जाऊ नये याची खबरदारी रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात येत असून शनिवारपासून या ठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा दिल्या जाणार आहेत. गरजेचे नसल्यास रुग्णांना अधिक काळ रुग्णालयात थांबवले जाणार नाही. पूर्वनियोजन करून करण्यात येणार्‍या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात येणार आहेत. नोकरीसाठी लागणारे फिटनेसचे प्रमाणपत्र, वयाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड पडताळणी, दिव्यांग प्रमाणपत्र आदी सेवा पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.

याची दखल सर्व नागरिकांनी घ्यावी. करोनापासून आपला तसेच कुटुंबियांचा बचाव करण्यासाठी या उपायोजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांनी अगर रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असे स्पष्ट केले आहे.

दररोज रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण
जिल्हा रुग्णालय व रुग्णालय परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी शनिवारपासून रोज दिवसातून दोनवेळा परिसरात हायप्रोक्लोराईड औषधाची फवारणी करण्यात येणार आहे. यात डॉक्टरांच्या तपासणी टेबल, खुर्चीसह बाह्य रुग्ण कक्ष, आपत्कालीन कक्ष, सर्वसाधारण कक्ष अशा रुग्णालयातील सर्व विभागांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २० फवारणी यंत्र जिल्हा रुग्णालयात एकत्र करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालय सुरक्षारक्षकांसाठी निर्जंतुकीरण द्रव्य (सॅनिटायझर) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही डॉ. सैंदाणे यांनी स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!