Friday, April 26, 2024
Homeनाशिकझूम ॲप द्वारे मित्र झाले लग्नाचे साक्षीदार

झूम ॲप द्वारे मित्र झाले लग्नाचे साक्षीदार

नाशिक । प्रतिनिधी

नेहरू युवा केंद्र नाशिकचे नांदगाव तालुका युवा राष्ट्रीय स्वयंसेवक अनिल निकम व नाशिक तालुका युवा राष्ट्रीय स्वयंसेवक मोनाली चव्हाणके यांचा शुभविवाह आज १७ माणसांच्या उपस्थितीत पंचवटी मधील सुमांगल वैदिक विवाह मंगल कार्यालय येथे पार पडला. अरेंज मॅरेज पद्धतीने होणारा हा विवाह तीन महिन्यापूर्वीच निश्चित करण्यात आलेला होता, लॉक डाऊन असल्यामुळे विवाह पुढे ढकलण्याची वेळ आली होती. परंतु मुलाचे वडील बापू विठ्ठल निकम व मुलीचे वडील सुनील बाळकृष्ण चव्हाणके यांनी एकत्र येऊन अवाढव्य खर्चाला टाळणू साध्या पद्धतीने विवाह करण्याचीही वेळ असल्याचं निश्चित केलं व सोशल डिस्टन्सचे नियम पाळत आज हा विवाह पार पडला.

- Advertisement -

मित्राचा विवाह असल्यामुळे या विवाहाचे साक्षीदार होण्याचा अनेकांना मोह असतो त्यामुळे या विवाहाचे साक्षीदार जरी होता आले नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून साक्षीदार होता यावे असा मनोदय मित्रपरिवाराने व्यक्त केल्यामुळे दैनिक देशदूत चे वार्ताहर महेश शेटे यांनी झूम ॲपच्या माध्यमातून सर्व मित्रांना या विवाहाचे ऑनलाईन साक्षीदार तर केलेच व विवाहाचा आनंदही दिला.

प्रसंगी हा विवाह जुळवून आणणारे सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा चे सचिव महेश शेटे, सुमांगल वैदिक विवाह मंगल कार्यालय व्यवस्थापक पल्लवी अंधृटकर, सहाय्यक प्रिया अंधृटकर, कुणाल काळे, सुनील सूर्यवंशी, रमेश निकम राजेश जाधव जनार्दन पवार रमेश शेळके अंजली चव्हाणके उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन हा विवाह नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या ५ मे च्या अधीसुचनेतील नियम क्रमांक सात मध्ये दिलेल्या सर्व अटी शर्ती पळून पार पडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या