Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंड्यांचे आगमन

Share

ना.रोड । प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा येत्या सोमवारी आहे. या यात्रेनिमित्त नाशिकरोड भागात नाशिकबरोबरच नगर, पुणे जिल्ह्यातून वारकर्‍यांच्या दिंड्यांचे आगमन  झाले. नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर तसेच भजन कीर्तनाने वातावरण वारकरीमय झाले आहे.

टाळ मृदुंगाच्या गजरात संत नामाचा गजर करत मार्गस्थ होत असलेल्या काही दिंडी दुपारी मुक्तीधाममध्ये दर्शनाला थांबल्या होत्या. भजन, किर्तन, संत नामाच्या गजराने सर्व परिसर दुमदुमून गेला होता. नाशिकरोडची उपनगरे तसेच मळ्यांमध्ये काही दिंडी मुक्कामी थांबल्या आहेत. त्या भागात सायंकाळी भजन, कीर्तन, महाआरती झाले. स्थानिकांनी वारकर्‍यांना भोजन देऊन महाप्रसाद वाटप केले. दिंडीचे व वारकर्‍यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!