प्राणघातक हल्ल्यात युवक ठार

0

नाशिक | प्रतिनिधी  गंजमाळ परिसरात भीमवाडी झोपडपट्टी जवळ अज्ञात हल्लेखोरांनी अरबाज शेरखान पठाण  वय १८, या तरुणावर  धारदार शस्त्राने हल्ला चढविला. त्याच्या पोटावर व छातीवर सपासप वार केल्याने अतिरक्तस्राव होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

घटनेनंतर काही वेळेतच जिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमल्याने एकच गोंधळ उडाला.

आपत्कालीन कक्षात मयताच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अन्य रुग्णांना अन्य कक्षात हलविण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*