Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अंबडच्या अनुप्रिया अल्ट्राटेक सोबत ऑस्ट्रेलीयन उद्योगाचा उत्पादन करार

Share

सातपूर । प्रतिनिधी

अंबड येथील अनुप्रिया अल्ट्राटेक या कंपनीने ऑस्ट्रेलिया येथील अर्बन वॉटर फाउंटन या कंपनीबरोबर उत्पानदनाचा करार केला असून, येणार्‍या काळात विविध क्षेत्रात ही नवीन उत्पादने आपले वेगळेपण सिध्द करतील असा विश्वास खा.हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.

अर्बन वॉटर फाउंटनचे व्यवस्थापकीय संचालक गॅरी अलन आणि संचालक सायमन हिंगीस यांनी नुकतीचअंबड औद्योगिक वसाहतीतील अनुप्रिया अल्ट्राटेक येथील कंपनीला भेट देत अनुप्रिया अल्ट्राटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राकेश पाटील, राम पाटील, राजेंद्र अहिरे तसेच गॅरी अलॅन व सायमन हिंगीस यांंच्या सोबत चर्चा करुन करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

हॉटेल ताज यथे झालेल्या संयुक्त बैठकीत याची घोषणा करण्यात  आली. यावेली खा. हेमंत गोडसे, आ. सिमा हिरे, आ. देवयानी फरांदे, महापौर सतिष कुलकर्णी, यांनी प्रकल्पाची माहीती घेउन भारत सरकारतर्फे सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.अर्बन वॉटर फाउंटन यांचे उत्पादन म्हणजे शुद्ध पाणी देणारे प्रॉडक्ट असून, त्याला फक्त पाण्याचे कनेक्शन जोडावे लागते . त्याला कोणत्याही इलेक्ट्रीसिटी ची गरज लागत नाही अशा प्रकारे ग्रामीण भागात देखील शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकते.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे व श्री.दवंगे महावितरणचे मुख्य अभियंता ब्रीजलाल जनवीर, तसेच एमआयडीसीचे अधिकारी, इरिगेशनचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी असे सरकारी अधिकारी उपस्थित होते.

नाशिकमध्ये ऑस्ट्रेलियन उत्पादन करून त्यामाध्यमातून शुद्ध पाणी देणे,सार्वजनिक सोसायटयांमध्ये, गार्डन मध्ये, जॉगिंग पार्क , रेल्वे स्टेशन, बसस्टेशन, ग्रामीण व आदिवासी भागात अशा अनेक ठिकाणी उपयुक्त ठरु शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे होणारे आजार टाळता येतील. तसेच हे उत्पादन पर्यावरणाला पूरक आहे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ व शुध्द पाणी मिळाल्यानेे प्लास्टीक बाटलीचा वापर कमी होईल –राजेंद्र अहिरे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!