Friday, April 26, 2024
Homeनाशिकसेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळाले सर्व देय रक्कमचे धनादेश

सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळाले सर्व देय रक्कमचे धनादेश

नाशिक । प्रतिनिधी

सरकारी सेवक सेवानिवृत्त होतानाच त्याच्या निवृत्ती समारंभातच त्याला देय असलेले सर्व लाभ दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हा नवीन पायंडा घातला आहे. निवडणूक शाखेचे सेवक बी. एल. चव्हाण यांना सेवानिवृत्ती समारंभातच देय असलेले सर्व रकमेचे धनादेश देत निरोप देण्यात आला. पेन्शनही त्याच दिवशी मंजूर झाली आहे.

- Advertisement -

सरकारी काम, सहा महिने थांबे असे नेहमी म्हटले जाते. त्याचा फटका सर्वसामान्यांच नव्हे तर सरकारी सेवकांनीही बसतो. निवृत्तीच्या वेळेस जीपीएफ, पीपीएफसह इतर सर्व देय असलेल्या रकमा या संबंधित अधिकारी निवृत्त झाल्यानंतरच पूर्तीसाठी प्रक्रिया केली जाते. त्यातून होते असे की, सेवक निवृत्त होतो, पण त्याच क्षणी हाती काहीच मिळत नाही. त्यासाठी त्याला प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा त्यात अनेक त्रुटी काढल्या जातात. त्याची पूर्तता करण्यासाठी त्याला निवृत्तीनंतर कार्यालयात खेटा माराव्या लागतात. हे सारे बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेतला.

सेवक निवृत्त होईल त्याच दिवशी त्याला लाभ मिळायला हवा यासाठी त्यांनी भूसंपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्याची सुरुवात बी. एल. चव्हाण या सेवानिवृत्त झालेल्या सेवकापासून झाली आहे. निवृत्तीवेळी चव्हाण यांना जीपीएफचे २५ लाख ३८ हजार ३९९ रुपयांचा धनादेश देण्यासह रजा रोखीकरणाचे ६ लाख ४४ हजार ६७० धनादेश मिळाला आहे. पेन्शनही २७ फेब्रुवारी २०२० रोजीच मंजूर झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या