Friday, April 26, 2024
Homeनाशिकवालदेवी नदीवर शेवाळयुक्त झालर

वालदेवी नदीवर शेवाळयुक्त झालर

नाशिकरोड । प्रतिनिधी

वडनेर येथील वालदेवी नदी प्रदुषित झाली असून नदीपात्रावर शेवाळयुक्त झालर तयार झाली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे रोग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने देवळालीगाव व वडनेर येथील वालदेवी नदीपात्र कोरडे ठाक झाले आहे. नदीपात्रात ज्या ठिकाणी थोडेफार पाणी आहे ते ठिकाण शेवाळाने व्यापले आहे. विशेषत: वडनेर दुमाला गावातून वाहणार्‍या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेवाळ आले आहे. त्यामुळे येथून मार्गक्रमण करणार्‍यांना नदीपात्रावरील शेवाळ बघून नदीपात्रावर लॉन्स निर्माण झाल्याचा आभास होत आहे.

शेवाळयुक्त नदीपात्रामुळे प्रदुषण वाढत असून दुर्गंधी पसरली आहे. नदीपात्राची नियमित स्वच्छता होत नसल्याने शेवाळ वाढल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या ठिकाणी तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या