Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ.एन.जी.पाथरकर व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी अरुण नेवासकर यांची निवड  

Share

नाशिक | प्रतिनिधी 

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्लीची राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठकीत  विविध ठराव मंजूर करण्यात आले असून  राष्ट्रीय महासंघाच्या अध्यक्षपदी डॉ.एन.जी. पाथरकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी अरुण नेवासकर व कार्याध्यक्षपदी भास्करराव टोम्पे, महासचिवपदी ईश्वर धिरडे, मुख्य समन्वयक अनंत जगजाेड, प्रसिद्धी प्रमुख महेश मांढरे ,  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अमरावती चांदूर बाजार येथील  जी.एस. टोम्पे महाविद्यालयातील संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात बैठक आयोजक भास्करराव टोम्पे यांच्या व अठरा राज्यातील आलेल्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत  बैठकीस संत नामदेव महाराज प्रतिमा पूजन ,दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. या बैठकीस भारतातील विविध राज्यातील राष्ट्रीय महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संत शिरोमणी नामदेव महाराजांचे अनुयायांसह विविध शिंपी समाज पोटजातीतील विखुरलेले ज्ञातीबांधव संघटित झाले तर राष्ट्रीय स्तरावरिल पाच ते सहा करोड शिंपी समाज बांधवाची विशेष ताकद तयार होईल व त्यामुळे राजकारणी नेत्यांना शिंपी समाज बांधवांचा विचार करावा लागेल. राजकारणात सामजिक गरज निर्माण होऊन शिंपी समाजास विशेष स्थान प्राप्त होऊ शकते त्यासाठी संघटन होणे आवश्यक आहे .

या दोन दिवसीय सभेत संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५० वी जयंतीनिमित्त २०२० वर्ष हे साजरे करण्याचे सर्वांनुमते ठरविण्यात आले.  संपूर्ण भारतभर  मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. ही मशाल यात्रा पंढरपूर येथून सुरुवात होऊन या यात्रेद्वारे भारतातील विविध ठिकाणी सामाजिक एकता ,बंधुता व संत नामदेवांच्या विचारांची जनजागृती करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्षपदी डॉ.एन. जी. पाथरकर व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी अरुण नेवासकर ,कार्याध्यक्षपदी भास्करराव टोम्पे ,महासचिवपदी ईश्वर धिरडे, मुख्य समन्वयक अनंत जगजाेड, प्रसिद्धी प्रमुख महेश मांढरे आदिची नियुक्ती करण्यात आली.

यां नवनिर्वाचित पदाधिकाऱयांचे विविध राज्यातून आलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱयांनी स्वागत केले . उपस्थित पदाधिकाऱयांचे स्वागत व प्रास्तविक श्री भास्कर टोम्पे  व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण खाेडे यांनी केले.  पुढील कार्यकारिणीची बैठक लवकरच होऊन त्यात राज्यस्तरीय पदाधिका‌‌‍‌‍‌‍‌‍‌‍-यांची नियुक्ती  करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण नेवासकर यांनी जाहीर केले.

१) अध्यक्ष – डॉ.एन. जी. पाथरकर

२)  प्रदेशाध्यक्ष – अरुण नेवासकर

३) कार्याध्यक्ष – भास्करराव टोम्पे

४) महासचिव – ईश्वर धिरडे ,

५) मुख्य समन्वयक – अनंत जगजोड

६) प्रसिद्धी प्रमुख – महेश मांढरे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!