Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

‘आयमा’तर्फे औद्योगिक वसाहतीत वृक्षारोपण

Share

सातपूर । प्रतिनिधी

आयमातर्फे अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये स्वच्छ व शुद्ध हवा राहावी तसेच प्रदूषणावर नियंत्रण राहावे यासाठी शुक्रवारी आयमा रिक्रिएशन सेंटर परिसरात एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ५ हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला.

या वृक्षारोपण उपक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे नाशिक विभागाचे महाव्यवस्थापक सतीश भामरे, एमआयडीसीचे अभियंता दुष्यंत उईके, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक देवीदास गोरे तसेच आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, ललित बूब, सचिव राजेंद्र पानसरे, अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, एचपीसीएलचे प्रलय जांबूळकर व अनुराग शेट्टी, भरत काटकर उपस्थित होते.

यावेळी आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी आयमा करीत असलेल्या विविध उपक्रम व सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. तसेच आयमाने काही वर्षांपासून ‘क्लीन अंबड, ग्रीन अंबड’ची संकल्पना पूर्ण करण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी एमपीसीएल कंपनीतर्फे उपस्थितांना आठ प्रकारचे सीड बॉलचे वाटप करण्यात आले.

यावेळी सर्व पदाधिकार्‍यांबरोबर चर्चा करताना हेमांगी पाटील यांनी आयमातर्फे करण्यात असलेल्या वृक्षारोपणासारख्या कार्याचे कौतुक केले. ‘क्लीन अंबड, ग्रीन अंबड’ करण्याच्या उपक्रमालाच पोषक असे काम आपण एमआयडीसीत आल्यापासून करीत आहोत. ‘क्लीन एमआयडीसी, ग्रीन एमआयडीसी’ करण्याचे ठरवले आहे. तसेच उद्योगांसाठी जागेचे आरक्षण, औद्योगिक वसाहतीत वाढत चाललेले अतिक्रमण व मोकळ्या भूखंडांना तार कंपाऊंड, इतर विविध स्वरुपातील प्रश्‍न, समस्यांवर लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. उद्योजकांना भेडसावणार्‍या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्‍वासनही दिले.

यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष बी. ई. कोतवाल, जे. एम. पवार, बी. पी. सोनार,विजय तलवार, एस. एस. आनंद, एस. एस. बिरदी, संदीप सोनार, ज्ञानेश्‍वर गोपाळे, विवेक पाटील, सुरेश माळी, निखिल पांचाल, उन्मेष कुलकर्णी, राजेंद्र अहिरे, प्रमोद वाघ, आर. एस. नाईकवाडे, विनायक मोरे, आशिष नहार, एन. टी. गाजरे, दिलीप वाघ, अविनाश मराठे, राजेंद्र कोठावदे, जयदीप अलिमचंदानी, विजय जोशी, सुनील जाधव, प्रकाश ब्राह्मणकर, विकास माथुर, राहुल गांगुर्डे, देवेंद्र राणे, जयंत पगार, प्रज्ञा पाटील, सुजित भोर, विरल ठक्‍कर आदींसह परिसरातील उद्योजक उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!