Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतील कंत्राटी सेवकांना जीवन विमा संरक्षण : खा...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतील कंत्राटी सेवकांना जीवन विमा संरक्षण : खा .डॉ .भारती पवार

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई मधील कंत्राटवर काम करत असलेल्या सेवकांना जीवन विमा संरक्षण ,जोखीम भत्ता ,सानुग्रह भत्ता व वाढीव वेतन आदी योजनांचे लाभ मिळावे,अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार राज्य सरकारने यावर तातडीने गांभीर्य दाखवत सर्व कंत्राटी सेवकांना जीवन विमा संरक्षण देण्यात आले आहे.अशी माहिती खा .डॉ .भारती पवार यांनी दिली.

- Advertisement -

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवकांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई मधील कंत्राटवर सेवक हे अविरत काम करत आहेत. ही संस्था १९९८ पासून महाराष्ट्रात कार्यरत आहे .या संस्थेत अनेक सेवक कंत्राटवर काम करतात.या सेवकांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने आजपावेतो कुठल्याही प्रकारचे लाभ देण्यात आलेले नाही .ह्या करोना विषाणूचा प्रादुर्भावाचा प्रसार रोखण्याकरिता हे सर्व कंत्राटी सेवक आपल्या जीवाची पर्वा न करता आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

ह्या सर्व सेवकांना जीवन विमा संरक्षण ,जोखीम भत्ता ,सानुग्रह भत्ता व वाढीव वेतन आदी योजनांचे लाभ मिळावे,अशी मागणी खा .डॉ .भारती पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने यावर तातडीने गांभीर्य दाखवत सर्व कंत्राटी सेवकांना जीवन विमा संरक्षण देण्यात आले आहे.

याबद्दल सर्व कंत्राटी सेवकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लावल्याबद्दल खा.डॉ.भारती पवार यांचे आभार व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या