Friday, April 26, 2024
Homeनाशिकआनंददायी शिक्षण पद्धतीचा अवलंब करा : विक्रम सारडा

आनंददायी शिक्षण पद्धतीचा अवलंब करा : विक्रम सारडा

नाशिक ।  प्रतिनिधी 

शिक्षक शाळेत आनंदी असेल तरच विद्यार्थी आनंदी असू शकतो. शिक्षकांनी विद्यार्थी शोधायला बाहेर पडू नका तर विद्यार्थी स्वतः शाळेत कसे येतील यासाठी शाळेत आनंददायी शिक्षणाबरोबरच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आनंदी ठेवा केवळ गुणांच्या मागे न लागता सुसंस्कृत विद्यार्थी कसा तयार होईल यासाठी प्रयत्न करा असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद सोसायटी चे अध्यक्ष विक्रम सारडा यांनी केले.नाशिक क्लब येथे स्वामी विवेकानंद सोसायटी तर्फे शिक्षक कर्मचार्‍यांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

या कार्यक्रमांप्रसंगी कृष्ण लीला, रंग दे बसंती , दक्षिण भारतीय, कश्मिरी, घूमर इत्यादी नृत्याच्या माध्यमातुन एकात्मतेचा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर स्वाद वाचन, काव्यवाचन, अभंग, शास्त्रीय गीत, वर्‍हाड निघाले लंडनला हा एकपात्री प्रयोग, फिश- पाँड यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण शिक्षक वृंद यांनी केले. त्यानंतर संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष विक्रम सारडा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष जे. जे .पवार खजिनदार रमेश मते, सहसचिव वृंदा जोशी, सदस्य आशुमती टोणपे ,माधुरी देशपांडे ,प्रेरणा कुलकर्णी, नितीन व्यास ,शिक्षक प्रतिनिधी सर्व विभागाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. संस्थेचे सचिव सुनील बागुल यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता देशपांडे व कस्तुरी डावखरे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या