Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोनाबद्दल अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई!

करोनाबद्दल अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई!

आरोग्य विभागाच्या सायबर क्राईमला सूचना

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

गोमूत्र, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने यांच्या सेवनापासून करोना संसर्गाबाबत गैरसमज निर्माण करणारे संदेश समाजमाध्यमांवर पसरविणार्‍यांविरोधात आता कारवाई होणार आहे. असे चुकीचे संदेश पसरवून जनतेची दिशाभूल करणार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने सायबर क्राइमला दिले आहेत.

करोनाबाबतच्या गैरसमजामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. तसेच या आजारापासून मुक्ती मिळविण्यासाठी गोमूत्र, शेण खाण्याचे संदेश समाजमाध्यमांमधून दिले जात आहेत. करोना आजारावर सध्या तरी कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे अशा संदेशांमधून चुकीची माहिती पसरविली जात असल्याने याला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. सायबर क्राइमच्या अतिरिक्त महासंचालकांशी याबाबत चर्चा झाली असून अफवा पसरविणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

रुमालाचा वापर करा
एन ९५ मास्कच्या तुटवडयाबाबत चुकीचे संदेश पसरविले जात आहेत. हे मास्क केवळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांनीच वापरणे अपेक्षित आहे. त्यामुळे खुल्या बाजारात हे मास्क उपलब्ध नाहीत, यावरून असुरक्षिततचे वातावरण निर्माण केले जात आहे. नागरिकांनी मास्कपेक्षा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करणे योग्य आहे. वापरलेल्या मास्कची विशिष्ट पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे; परंतु आपण ते कचर्‍यात फेकतो. कचरा गोळा करणारी मुले, व्यक्ती यांना यातून संसर्ग होण्याचा धोका आहे. तेव्हा मास्कचा वापर न करता रुमालाचा वापर करावा आणि गरम पाण्यात रुमाल स्वच्छ धुवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या