Friday, April 26, 2024
HomeUncategorizedव्हॉटस्अ‍ॅपवर करता येईल ‘आधार’ तक्रारी

व्हॉटस्अ‍ॅपवर करता येईल ‘आधार’ तक्रारी

नाशिक । प्रतिनिधी

व्हॉटस्अ‍ॅपद्वारे महसूल निगडीत समस्या सोडवण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर याच माध्यमातून नागरिकांना आधारकार्ड व केंद्रांबाबत तक्रारी नोंदवण्याची सुविधा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्याची दखल घेत त्या दिलेल्या मुदतीत सोडवण्यात येतील.

- Advertisement -

छोट्या-मोठ्या कामांसाठीदेखील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागतात. अनेकदा सरकारी काम सहा महिने थांब याची प्रचिती नागरिकांना येते. त्यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्हॅटस्अ‍ॅप तक्रार निवारण कक्ष अन् त्यासाठीच नंबर उपलब्ध करून दिला.

याद्वारे महसूल विभागाशी निगडीत कामांच्या तक्रारी या व्हॅटस्अ‍ॅपद्वारे स्वीकारत त्यांची माहितीही त्याचद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू असल्याने आता त्यात नव्याने आधार नंबर, केंद्राबाबत कुठलीही तक्रार असेल, म्हणजे नवीन आधार नोंदणी, दुरुस्ती अथवा केंद्रचालकांकडून वसूल केली जाणारी वारेमाप रक्कम, होणार्‍या लुटीसह आधारबाबतच्या इतर कुठल्याही तक्रारी नागरिकांना या नंबरवर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

9421954400 या नंबरवर नागरिकांना केवळ व्हॅटस्अ‍ॅपद्वारेच तक्रार करता येईल. त्यावर थेट संपर्क किंवा फोन करता येणार नाही. शिवाय सबळ आणि योग्य पुराव्यांसह आपली तक्रार किंवा अर्ज करावा. तसेच तक्रार ही मोघम नसावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या