Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ; कलाकारांना होणार लाभ

Share

 

नाशिक । प्रतिनिधी

नाट्य, साहित्य आणि करण्यात आली आहे. या कलावंतांच्या मानधनात गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत दीडपट वाढ करण्यात आली असून, यापुढे ५० कलावंतांऐवजी आता १०० कलावंतांना दरवर्षी मानधन देण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वृद्ध कलावंतांची निवड करून, त्यांना दरमहा मानधन दिले जाते. आतापर्यंत शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यातील केवळ ५० कलावंतांची निवड करून त्यांना मानधन दिले जात होते. त्यातही वाढ करण्यात आली असून, आता प्रत्येक जिल्ह्यातील १०० कलावंतांना तिन्ही दर्जांमध्ये विभागून मानधनासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे.

जिल्हा पातळीवर जिल्हाधिकार्‍यांमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या कलाकार निवड समितीमार्फत दरवर्षी कलाकारांची निवड करण्यात येते. त्यासाठी जिल्हा पातळीवर वृद्ध कलावंतांचे अर्ज मागविण्यात येतात. संपूर्ण माहितीसह कलावंतांनी केलेल्या कामाची माहिती देणे आवश्यक असते. आलेल्या अर्जांची छाननी करून, मग कलावंतांची निवड करण्यात येते.

सरकारच्या या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील अधिकाधिक कलाकारांना मानधन प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. ज्या कलाकारांना आता वयोमानामुळे कला सादर करता येत नाही, त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो, अशा कलावंतांना आधार मिळणार आहे. वाढलेले पैसे वेळेवर मिळणार का? गेल्या दोन-तीन वर्षांपासून वृद्ध कलावंतांच्या मानधनाच्या प्रक्रियेत जिल्हा पातळीवर अनेक अडथळे येत आहेत. निवड समितीला अनेकदा वेळ नसल्याने ही प्रक्रिया लांबते; तसेच प्रक्रिया सदोष आहे, असाही आरोप अनेक जण करतात. यामुळे अनेकांची मानधनाची रक्कम मिळण्यासाठी वर्षे उलटतात.

अशी आहे मानधनात वाढ
राष्ट्रीय कलावंतांना ‘अ’, राज्यस्तरीय कलावंतांना ‘ब’ आणि स्थानिक कलावंतांना ‘क’ दर्जा, अशी कलावंतांची विभागणी आहे.

‘अ’ दर्जाच्या कलावंतांना आतापर्यंत दरवर्षी २५ हजार २०० रुपये (दरमहा २१०० रुपये) इतके मानधन दिले जात होते. त्यात आता वाढ करून, ३७ हजार ८०० रुपये (दरमहा ३१५० रुपये) दरवर्षी देण्यात येणार आहेत.

‘ब’ दर्जाच्या कलावंतांना २१ हजार ६०० रुपये मानधन देण्यात येत होते. त्याची रक्कम वाढवून आता ३२ हजार ६०० (दरमहा २७१६ रुपये) करण्यात आली आहे,

तर,  ‘क’ दर्जाच्या कलावंतांना आता वर्षाला १८ हजार रुपयांऐवजी २७ हजार रुपये (दरमहा २२५० रुपये) देण्यात येणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!