Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

रोजगार निर्मितीसाठी विकासाचा वेग वाढवावा; युवक काँग्रेसच्या ‘मैं भी नायक’ स्पर्धेत राज्यातील समस्यांंचा उहापोह

Share

नाशिक । प्रतिनिधी

युवक काँग्रेसने युवकांच्या आवाजाला बुलंद करण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून सुरू केलेल्या ‘मैं भी नायक’ स्पर्धेची अंतिम महाफेरी  (दि.१५ )मुंंबईत झाली.विधानसभेत ज्याप्रमाणे राज्याच्या प्रश्नांवर अभ्यासूपणे चर्चा होते.त्याच धर्तीवर शॅडो विधासभेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या स्पर्धक आमदारांनी महाराष्ट्रातील ज्वलंत समस्या सभागृहात मांडून सभागृह दणाणून सोडले.यावेळी अंतिम स्पर्धेतील २० विजेत्यांची नावेही घोषित करण्यात आली.

मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सेंजच्या सभागृहात सकाळी ९.३०  वा. ‘मैं भी नायक’ स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली. युवक काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त यांनी प्रास्ताविक केले.  स्पर्धकांनी राज्यापुढील प्रश्न मांडतानाच महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक सूचना केल्या. रोजगार निर्मितीसाठी विकासाचा वेग वाढविला पाहिजे, शेतीपूरक व्यवसायाला चालना द्यावी, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा.शेतीचा विकास जर घटल्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.

स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी,शेतकर्‍यांच्या शेतमालाला रास्तभाव द्यावा,पायाभूत सुविधांचा विकास करावा, तोट्यातील बीएसएनएलला मदतीचा हात द्यावा आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या,अशा सूचना केल्या. एका स्पर्धकाने इस सरकार से उम्मीद क्या करे, आम और खास सब परेशान हैं ! या शेरो-शायरीतून राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला.

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी वेकअप महाराष्ट्र :उद्यासाठी आत्ता हे अभियान खास युवकांना डोळ्यासमोर ठेऊन सुरु केले. या अभियानाला कुठलेही राजकीय स्वरूप न देता सर्व विचारधारेच्या युवकांनी यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य सूचना कराव्यात, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रासमोर आज अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण आजच जागे झालो नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही,असे सांगितले.

टॉप-२० विजेते

यावेळी स्पर्धेतील  २० विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांमध्ये प्रशांत राठोड, विजय अंजान , सौरभ शिगवण, गणेश गुप्ता, मनोज महाराणा , आशिष कांबळे, रोजपेला डिसुझा, शेहजाद मणियार , प्रगती सांगळे , रणजित जेडके , अजिंक्य बोराडे , ईश्वर तांबे , शुभम वकाडे , आकाश सारीख , पृथ्वीराज एकाले , वैभव दरेकर , शुभम हेंगाडे, अनुश्री हिरादेवे , मंजुश्री घोणे, स्वप्नील खरात यांचा समावेश आहे.

अंतिम स्पर्धेतील शॅडो विधानसभेत सभापती म्हणून काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आणि उपसभापती म्हणून काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र देहाडे,परीक्षक म्हणून आमदार भाई जगताप,ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर व साहिल जोशी,महिला काँग्रेसच्या सरचिटणीस उत्कर्षा रुपवते यांनी काम पहिले. युवक काँग्रेसच्या सरचिटणीस रिषिका राका यांनी सूत्रसंचालन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!