Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

महाविद्यालयांत प्लास्टिक बंदी; यूजीसीच्या विद्यापीठांना सूचना

Share

 

नाशिक । प्रतिनिधी

प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील उच्चशिक्षण संस्थांना त्यांच्या आवारात प्लास्टिकबंदी मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच उन्नत भारत अभियानात सहभागी झालेल्या कॉलेजांनी दत्तक घेतलेल्या गावांचे रूपांतर प्लास्टिकमुक्त गावांमध्ये करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकचा वापर कमी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यूजीसीनेही विद्यापीठे आणि कॉलेजांच्या आवारात प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याबाबतचे परिपत्रक यूजीसीने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना पाठवले आहे.

वेबसाइटवरही त्याची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिस्तबद्ध पद्धतीने प्लास्टिकचा वापर रोखण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे यूजीसीने सांगितले आहे. उच्चशिक्षण संस्थांमध्ये प्लास्टिकबंदी करण्यासाठी यूजीसीने मार्गदर्शक तत्त्वे तयार करून ती जाहीर केली आहेत.

शिक्षण संस्थेचा परिसर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, त्यासाठीचे धोरण निश्चित करावे, टप्प्याटप्प्याने प्लास्टिकचा वापर रोखून त्याऐवजी पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यात यावे, असे यूजीसीने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केले आहे.

शिक्षण संस्थांमधील उपहारगृहे, वसतिगृहांमध्ये प्लास्टिकचा वापर करण्यात येऊ नये, प्लास्टिक वापरण्यातील धोके आणि परिणामांची जागृती करण्यासाठी उपक्रम आयोजित करावेत, अविघटनशील प्लास्टिकच्या वस्तू आणण्यास विद्यार्थ्यांना मज्जाव करण्यात यावा, तसेच प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या न वापरता त्याऐवजी कागदी-कापडी पिशव्या आदींचा वापर करण्याच्या सूचना यूजीसीने दिल्या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!