Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला दोन लाख नाशिककर येणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनादेश यात्रा १८ सप्टेंबरला नाशिकमध्ये येणार असून दुसर्‍या दिवशी पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने तपोवन मैदानावर यात्रेची सांगता होणार आहे. या सभेची पक्षाने जय्यत तयारी केली असून दोन लाख गर्दी जमविण्याचे नियोजन केले आहे. या माध्यमातून भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून विरोधकांसह मित्रपक्षाला ‘स्वबळा’चा इशारा दिला जाणार आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांच्या उपस्थितीत वसंतस्मृती कार्यालयात शनिवारी (दि.१४) पक्षाची बैठक झाली. यावेळी प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, वसंत गिते, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, खा. डॉ. भारती पवार, आ. डॉ. राहुल आहेर आदी उपस्थित होते.

काळकर यांनी बुधवारी (दि.१८) महाजनादेश यात्रेत पाथर्डी फाटा ते त्रंबकनाका बाईक रॅली व त्यानंतर गोलक्लब ते पंचवटीकारंजा असा रोड शो होईल, अशी माहिती दिली. तसेच गुरुवारी (दि.१९) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असून त्याची तयारी करा, असे आदेश दिले.

मोदी यांच्या उपस्थितीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. बाईक रॅली व रोड शो मध्ये महिलांचा सहभाग अधिक असावा यादृष्टीने प्रयत्न करा, असे विजय पुराणिक यांनी दिले. मोदी यांच्या सभेसाठी जिल्ह्यातून १५ हजार वाहनातून दोन लाख येतील, असा दावा यावेळी पदाधिकार्‍यांनी केला. यावेळी समन्वय समिती, प्रमुख चौक स्वागत समिती, व्यासपीठ समिती, रॅली व वाहन नियोजन समिती, प्रसिध्दी समिती, शहर सजावट समिती आदी समित्याच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

अटल मैदानाची पाहणी
प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांनी तपोवनातील साधुग्राम येथील अटल मैदान येथे भेट देवून सभा स्थळाची पाहणी केली. सभेच्या नियोजना संदर्भात संबंधितांना सूचना केल्या.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!