Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ९ लाख ७९ हजार मतदार

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील १५  विधानसभानिहाय मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून जिल्ह्यात १८  ते १९  वयोगटातील तरुण मतदारांची संख्या ही ९  लाख ७९ हजार इतकी आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ४५  लाख २४  हजार मतदार मतदानाच हक्क बजाविण्यास पात्र आहेत.

राज्यातील २८८  मतदारसंघासाठी निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या शद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यांत आला होता. त्यात जिल्ह्यात ५६  हजार दुबार व मयत मतदारांची नावे वगळण्यात आली. नाव, पत्ता दुरुस्ती, स्मार्ट कार्ड वाटप, नवमतदारांची नोंदणी आदी कामे प्राधान्याने करण्यात आली.

मतदारांची संख्या वाढावी यासाठी विशेष मतदार नोंदणी हाती घेण्यात आली होती. १५  जुलैला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर मतदार याद्या शुद्धीकरण करून ३१  ऑगस्टला विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील १५  विधानसभानिहाय मतदारसंघ मिळून ४५  लाख २४  हजार इतके मतदार आहेत. जिल्ह्यात १८  ते १९  या वयोगटातील मतदारांची संख्या ही ९  लाख ७९  हजार इतकी आहे.
..
वयोगटातील मतदार संख्या
वयवर्षे                   मतदार
१८-१९                 ९  लाख ७९
२०-२९                 ९ लाख २६ हजार ७७६
३०-३९                ११ लाख  १० हजार ५१५
४०-४९                 ९ लाख ८० हजार ६८७
५०-५९                 ६ लाख ७४ हजार ८२१
६०-६९                 ४ लाख ८ हजार ५४०
७०-७९                 २ लाख १७ हजार ३६४
८० प्लस                १ लाख १५ हजार ८८१

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!