Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

मिरवणुकीतील आवाजावर राहणार लक्ष; प्रदुषण मंडळाकडून होणार मोजणी

Share

नाशिक । प्रतिनिधी

गणेश विसर्जन मिरवणुकीतील आवाजावर पोलिसांनी मर्यादा आणल्या आहेत; पण त्यांचे पालन होते की नाही, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिस विविध माध्यमांतून मिरवणुकीतील आवाजांकडे लक्ष ठेवणार आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गातील सगळे चौक आणि परिसरातील रस्त्यांवर चोवीस तास आवाजाची मोजणी होणार आहे.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील आवाजाची पातळी दर वर्षी वाढत असल्याने पोलिस प्रशासनाने मिरवणुकीत साउंड सिस्टीम आणि स्पीकरच्या भिंतीवर गेल्या दोन वर्षांपासून बंधने आणली आहेत. मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये किती असावीत, याचेही नियम जाहीर केले आहेत. गेल्या वर्षी प्रशासनाने नियमांची कठोर अंमलबजावणी केल्यामुळे संध्याकाळी स्पीकरच्या भिंतीमुळे होणारे ध्वनिप्रदूषण काही प्रमाणात कमी करण्यास प्रशासनाला यश आले होते. या वर्षी पोलिसांची मंडळाच्या स्पीकरच्या भिंतींबरोबरच पारंपरिक वाद्यांवरही करडी नजर राहणार आहे.

स्पीकरला पर्याय म्हणून मंडळे आता ढोल-ताशे पथकांची संख्या वाढवत आहेत. परिणामी ध्वनिप्रदूषणात वाढच होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी वाद्यांवर बंधने घातली आहेत. या धर्तीवर मिरवणूक सुरू झाल्यापासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि पोलीसांकडून गणेश विसर्जन मिरणवणुकीत ध्वनीच्या पातळीची मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी काही कर्मचारी चौकाचौकात थांबून दर तासाने आवाजाच्या नोंदी घेणार आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!