Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पोलीस वाहनांवर बसविणार कॅमेरे; घटनास्थळाची परिस्थिती होणार ‘रेकॉर्ड’

Share

नाशिक। प्रतिनिधी

ग्रामीण पोलिस दलाने आपल्या ताफ्यातील ५०  वाहनांवर पीटीझेड व्हेइकल माउंट कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आपत्कालीन स्थितीचे चित्रण पोलिसांना उपलब्ध होणार आहे. याबाबत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यन्वित होण्याची अपेक्षा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात काही अतिसंवेदनशील तालुके आहेत. तसेच दंगल, दरोडा आदी गंभीर घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हे कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याची आवश्यकता असलेल्या ठिकाणी पोहचावे लागते.

यावेळी उपलब्ध पोलिस कर्मचारी जमावाला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करतात. पोलिसांना त्याचवेळी संशयितांना अटक करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. वाहनांवरील कॅमेर्‍यांमुळे घटनास्थळावरील परिस्थिती रेकॉर्ड होत राहील. वाहनांवर कॅमेरे असल्याची जाणीव असल्यास दंगली करणारे अथवा इतर समाजकंटकांवर त्याचा प्रभाव पडू शकतो, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. बर्‍याचदा पोलिसांच्या वाहनांवर होणारे हल्ले यामुळे कमी होऊ शकतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

असे असतील कॅमेरे
पोलीस वाहनांवर बसविले जाणारे हे कॅमेरे ३६०  अंशात उच्च दर्जाचे रेकॉडींग करू शकतील, रात्रीच्यावेळी इन्फ्रारेड कट फिल्टर आणि १६  एक्सझूम यामुळे वाहनांवरील कॅमेरे घटनास्थळाचे तसेच व्हॅनच्या आजूबाजूच्या नागरिकांच्या हालचाली टिपू शकणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!