Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ज्येष्ठा गौरींचे होणार शुभागमन; महिला वर्गाची खरेदीसाठी गर्दी

Share

नाशिक | प्रतिनिधी

बाप्पा पाठोपाठ श्री महालक्ष्मीचेही घरोघरी शुभागमन होत असून,गौरीच्या नवेद्यासाठी लागणारे केळीचे पान ते विविध फुलांचे हार, दागिने, वस्त्रमाळ, फराळाचे साहित्य, वाणसामान यासह विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारात महिलांची गर्दी दिसून येते आहे. (दि.५  गुरूवारी ज्येष्ठा गौरींचे घरोघरी आवाहन असून सजावटीचे सामान, गौरींचे मुखवटे व अन्य साहित्याची खरेदी महिला वर्गाकडून केली जात आहे.

मुखवटे खरीदी करण्यासाठी तसेच पितळी मुखवटे रंगवून घेण्यासाठीही गर्दी होत आहे. गौरींच्या आवाहनानंतर भाजी-भाकरीचा नैवेद्य आणि दुसर्‍या दिवशी पुरणपोळी सोळा भाज्यांचा साग्रसंगीत नैवेद्य दाखवून हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी खिरापत, दूध, पेढे यांचा नैवेद्य आवाहनानंतर गौरीला दाखवला जातो. तर दुसर्‍या दिवशी काही ठिकाणी सकाळी- सायंकाळी पुरणाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे.

सण तोंडावर आला असून हार, सुपारी, हारांची जोडी, पाच फळांसह आन्य फळे खरेदी केली जात आहे. शहरातील भांडी बाजार, रविवार कारंजा, मेनरोड भागात खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. नव्याने आलेले दागिने आणि मुकुट, हार, विड्यांची पाने, वस्त्रमाळा, ओटीचे साहित्य यांची खरेदी करताना महिला धावपळ करीत आहे.

अश्या बसवितात गौरी
गणपतीमध्ये साधारण तिसर्‍या दिवशी गौरी आवाहन केले जाते. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. प्रत्येक कुटुंबात कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते.

मुखवट्यांचे नानाविध प्रकार
गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!