Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सायकलची मेड इन नाशिक ‘लेडी’

Share

नाशिक । दिनेश सोनवणे

शहरात चौफेर वाहतूकोंडीला सामोरे जावे लागते आहे. सार्वजनिक सायकलचा वापर वाढावा यासाठी सायकलसेवा सुरु झाल्या, मात्र त्यांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला. चांगल्या प्रतिच्या सायकल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने सायकल वापरण्याची इच्छा असूनही अनेकजन वंचित राहतात. हे लक्षात आल्यानंतर नाशिकमधील श्रेया खाबिया हिने काही मित्रांना सोबत घेऊन किफायतशीर दरात सायकल उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सहा महिने संशोधन केल्यानंतर, चीन, तैवान सारख्या देशातील ५० पेक्षा अधिक कंपन्या पालथ्या घातल्या नाशिकमध्ये रॅडर्स बाईकची स्थापना केली.

कंपनी स्थापन केल्यानंतर सर्वसामान्यांना देखभालीची गरज नसणारी सायकल कमी किंमतीत उपलब्ध झाली. अवघ्या सहा महिन्यात कंपनीची व्याप्ती कुठल्या कुठे वाढली आहे. यातून सायकल चळवळीला बुस्ट मिळाला, सर्वसामान्यांच्या आवाक्यात सायकल आल्या, शिवाय, उद्योगाची नवी दिशादेखील मिळाली.

श्रेयाने नाशिच्या सेंट फ्रान्सिसमधून शालेय शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर आरवायके महाविद्यालयातून ११ वी १२ वीचे शिक्षण पुर्ण केले. एमआयटीमधून सिव्हील इंजिनियरींगचे शिक्षण तिने पुर्ण केले. एसपी जैन महाविद्यालयातून ती फॅमिली मॅनेजमेंट ऑफ बिझनेस झाली. जीएसटी, रेरा, नोटबंदी यासारख्या देशात घटना घडल्या. त्यानंतर तिने वडीलोपार्जित व्यवसायाशी निगडीत फील्ड तिथेच सोडली.

यानंतर वडील प्रविण खाबिया हे यादरम्यानच्या काळात सायकलीस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष झाले. यावेळी सायकल कट्टयावर दररोज सायकलीस्टची ये-जा वाढली. यामध्ये अनेकांशी चर्चा होऊ लागल्या. सायकल संघटन का कमी पडते आहे? यावर संशोधन झाले. सर्वसामान्यांच्या आवाक्यात सायकल्स नाहीत त्यामूळे चळवळीची व्याप्ती वाढत नसल्याचे लक्षात आले.

जगातील ९० टक्के सायलचे उत्पादन चीन, तैवान मध्ये होते. तिथेही जवळपास ५० पेक्षा अधिक कंपन्यांना भेटी दिल्या. तिथूनही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर श्रेयाने राष्ट्रीय सायकलपटू, बायसिकल मटेरियल रिसर्चर, महाविद्यालयातील मार्गदर्शक शिक्षक आणि एक मित्र जो कंपनी व्यवस्थापन बघतो यांना सोबत घेऊन किफायतशीर दरात सायकल उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

यानंतर युनिक ओ झिरो या मेंटनन्सफ्री सायकलचा भारतात जन्म झाला. या सायकलमध्ये हवा भरायची गरज नाही. सायकल पडल्यावर नुकसान होत नाही. वयवर्ष चार ते ७० वर्षांचे प्रत्येकजण ही सायकल चालवू शकते. महिला अगदी साडी नेसूनही ही सायकल चालवू शकतात अशी बनविण्यात आली. ठाण्यामध्ये जवळपास 50 पेक्षा अधिक महिलांना सायकल चालविण्याचे प्रशिक्षण दिले.

यादरम्यान, ५६ वर्षांच्या आजीबाई पहिल्या सायकल रायडर ठरल्या होत्या. त्यानंतर सायकल हॉटेल्स, रिसॉर्टस्, विशेष मुलांसाठी या सायकलींचे वाटप करण्यात आले. नाशिक, आयआयटी पवई येथे या सायकल्सचे डिझाईन केले जाते. आवड, काम आणि समाधान आमच्या कंपनीत मिळाल्यामूळे सर्व हित साध्य झाल्याचे श्रेया सांगते.

फॅक्टरी आऊटलेटमधून सायकल खरेदी केल्यावर ग्राहकांना सोयीस्कर हप्त्यांमध्ये सायकल खरेदी करता येते. साडेपाच हजारांपासून ३३ हजारांपर्यंत सायकल याठिकाणी उपलब्ध केल्या आहेत.

सार्वजनिक वापरासाठी ‘रॅडर बाईक’
वाढलेल्या वाहतूकीला पर्याय, तसेच पर्यावरणाचा र्‍हास टाळण्यासाठी नाशिकमध्ये सार्वजनिक सायकल सेवा सुरु आहे. याच धर्तीवर अमरनाथमध्ये रॅडर बाईकने सेवा देण्यास सुरुवात केली आहे.येथील महापालिकेने यास मंजूरी दिल्यानंतर १०० सायकली प्रायोगिक बेसिसवर सुरु असून लवकरच यात वाढ होणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!