Saturday, April 27, 2024
Homeनाशिक९ किलो गांजासह वाहन जप्त, घोटी पोलीसांची कारवाई

९ किलो गांजासह वाहन जप्त, घोटी पोलीसांची कारवाई

इगतपुरी । प्रतिनिधी

मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी सिन्नर फाट्याजवळ मुंबईला कांदे घेऊन जाणाऱ्या टेम्पोची झडती घेतली असता ९ किलो गांजासह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस आधिकारी अरूंधती राणे व तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड यांनी भेट दिली असुन या कारवाईने मादक पदार्थाची ने-आण करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या कोरोनो विषाणु संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र या बंदमध्येही मादक पदार्थाची वाहतुक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बिनधास्त पणे चालु असल्याचे समोर आले आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी येथे सिन्नर फाट्याजवळील मुलचंद गोठी गार्डनजवळ घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर मुंबईला जाणाऱ्या व मुंबईहुन येणाऱ्या वाहनांची तपासणी चालु होती. रविवारी दुपारच्या सुमारास अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली छोटा हत्ती या ( एम. एच ०४ जे. के. ९६३७ ) टेेम्पोतुन मुंबईला कांदे घेऊन जात होता.

मात्र, पोलीसांना पहाताच या टेम्पोतील चालक पळुन गेला. पोलीसांनी या टेम्पोची झडती घेतली असता कांद्याच्या गोण्याखाली प्लॅस्टीकमधे पॅक केलेले मादक पदार्थाचे ( गांजा ) ९ किलोचेे पाकीट आढळुन आले. या गांजाची किंमत अंदाजे १ लाख २९ हजार रुपये, टेम्पो ३ लाख रुपये, कांदे ६ हजार ३०० रूपये असा ४ लाख ४१ हजार ८०० रुपये कीमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या टेम्पोतील संशयित सादीर साबीर शेख, वय २२ वर्ष, राहणार मुंब्रादेवी मंदीर, मुंब्रा, जिल्हा ठाणे यास ताब्यात घेतले असुन दुसरा संशयित रईस राहणार मुंब्रा पुर्ण नाव माहीत नाही हा फरार झाला आहे. या बाबत घोटी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विलास आनंदा घिसाडी यांनी फिर्याद दिली असुन विना परवाना मादक पदार्थाची वाहतुक कलम कायद्याअंतर्गत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या