Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

औद्योगिक क्षेत्रात मंदी : एकवटल्या सर्व कामगार संघटना; राज्यव्यापी जनआंदोलन करण्याचा निर्णय

Share

सातपूर । प्रतिनिधी

शासन स्तरावरून मंदीच्या कारणावर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात असल्या तरी त्या सवलती केवळ बड्या भांडवलदारांच्या वाट्याला येणार आहेत कामगारांचा रोजगार व त्या अनुषंगाने त्यांच्यावर कोसळणार्‍या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अन्यथा कामगारांना संघटितपणे शासनावर दबाव टाकण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन सिटूचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी केले.कामगारांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी आणि कामगार विभागांसमोर राज्यव्यापी जनआंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

औद्योगिक क्षेत्रात पसरलेली मंदी आणि त्यामुळे कामगारांचे होणारे हाल यावर विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी (दि.२४) उत्तर महाराष्ट्रासह पुणे ,औरंगाबाद ,मुंबईच्या विविध युनियन पदाधिकार्‍यांची बैठक खुटवडनगर येथील सिटू भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैंठकीत डॉ. कराड बोलत होते.

सर्व स्तरांवर मंदीचे चर्चा सुरू आहे उद्योगांना त्याची झळ बसत असल्याचे बोलले जाते प्रत्यक्षात मंदीचा फटका हा असंघटित कामगार तसेच छोट्या व मध्यम उद्योगांना बसत आहे आज रोजगार बुडाल्याने असंघटित कामगारांचे कर्ज थकीत होऊ लागले आहेत उद्योगांनी मागील दोन-तीन महिन्यांपासून कामगारांना कामावर घेणे बंद केले.

परिणामी त्यांचे कर्जाचे हप्ते थकू लागल्याने  शासनस्तरावरून या कामगारांचे कर्ज नव्हे तर केवळ व्याज माफ करावे अशी मागणी करावी लागणार आहे उद्योगांना सवलती देऊन त्या कामगारांपर्यंत पोहोचणार नाहीत त्यामुळे कामगार कामगारांना असंघटित कामगारांना बेरोजगारी भत्ता ही लागू करावा अशा आशयाची मागणी शासनाकडे करण्याची वेळ आली आहे.

सरकारने उद्योगांना १४ हजार कोटीचे कर रद्द केले आहेत आज पन्नास हजाराहून जास्त कंत्राटी कामगार घरी बसलेले आहे येणार्‍या आणखी दोन-तीन महिन्यात ही परिस्थिती राहिल्यास लाखाहून जास्त कायम कामगारांची स्थिती असेल त्याचे परिणाम येणार्‍या दिवाळीतील इतर उत्पन्नावर होईल तसेच बोनस आहे तसेच संघटितपणे या मंदीच्या काळात कामगारांचा विचार करण्यासाठी दाद मागावी शासन स्तरावरून एकट्याला फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याने राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी लाखो कामगारांचे मेळावे आयोजित करून शासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना कामगार प्रतिनिधींनी यावेळी केल्या

या बैठकीला डॉ. डी.एल. कराड, किशोर ढोकले, प्रवीण मोहिते, उद्धव भावलकर, राजू देसले, बाळासाहेब वाघ, वसंत पवार, उत्तम खांडबहाले, सईद अहमद, विवेक मोंटेरो, प्रवीण पाटील, सर्वश्री अशोक घुगे, रूपेश वरपे, प्रवीण मोहिते, तुकाराम साळवी, संजय कसुर्डे, शशिकांत मांद्रे, दामोदर मानकापे, सीताराम थंबरे, भिवाजी भावले, कैलास धात्रक, श्रावण केदारे, योगेश अहिरे आदींसह विविध कारखान्यांतील २०० कामगार प्रतिनिधी हजर होते

मागण्या ;-

* मंदीमुळे कामगार बेरोजगार झालेल्या कंत्राटी, एनईईएम आणि फिक्स टर्म कर्मचार्‍यांंना पुन्हा नोकरीत घेईेपर्यंत किमान वेतन मिळावे.

* या कामगारांच्या कर्जावरील व्याज सरकारने भरले पाहिजे.

* योग्य अनुदानाद्वारे कामगारांच्या मासिक वेतनातून त्यांच्या कमाईचे रक्षण करा.

* त्या कामगारांना दिवालीतील बोनस दिलेच पाहिजे.

* मंदीचे परिणामावर उपाययोजनावर चर्चा करण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची आपातकालीन बैठक घ्यावी.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!