Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

आवाज ढोलताशा पथकांचा..!

Share

नाशिक । प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नवे ताल आणि वादनातील वैविध्यासह ढोलताशा पथके सज्ज झाली आहेत. महिनाभरापासून शहराच्या विविध भागांमध्ये सुरू असलेला सराव अंतिम टप्प्यात पोहोचला असून तालाचा लयबद्ध आविष्कार नाशिककरांना अनुभवता यावा, यासाठी पथकांची तयारी सुरू आहे.

ढोलताशाच्या गजरात होणारे बाप्पाचे आगमन हा अभूतपूर्व सोहळा असतो. हा सोहळा अधिक देखणा करण्यासाठी शहरातील ढोलताशा पथकांनी कंबर कसली आहे. गणरायाच्या आगमनासाठी ढोलताशा पथके गेल्या दीड-दोन महिन्यांपासून तयारीला लागली आहेत.

शहरातील विविध ठिकाणी तसेच शाळांची मैदानांवर सध्या ढोलताशांचा आवाज नागरिकांच्या कानावर पडत आहे. गेल्या काही वर्षांपासून परंपरा आणि उत्साहाच्या वातावरणात सहभागी होण्याची ओढ असल्याकारणाने तरुण व तरुणी पथकांकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे शहरातील पथकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

कोट्यवधींची उलाढाल
गणेशोत्सव काळात पथकांना साधारणपणे १ ते ६ लाख रुपयांपर्यंत मानधन मिळते. दहा दिवसांच्या काळात साधारणपणे ८ ते ९ कोटींची उलाढाल होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!