Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पोलीस प्रशासनाच्या बँकांना सूचना; एटीएमबाहेर सुरक्षारक्षक तैनात करावे

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहर परिसरात फोडण्यात आलेले एटीएम हे स्टेट बँक ऑफ इंंडियाचे असून तेथे सुरक्षा व्यवस्था नव्हती, सुरक्षा रक्षक नव्हता तसेच हे मशीन जुन्या पद्धतीचे असल्याने चोरट्यांना फोडण्यास सोपे गेल्यानेच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा ठपका पोलीस प्रशासनाने ठेवला आहे. पोलीस प्रशासनाने सर्वच बँकांना एटीएम सुरक्षेबाबत कडक सूचना केल्या आहेत.

शहरातील जेलरोड परिसरातील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १३ लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद गावात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून चोरट्यांनी सुमारे ३१ लाख ७५ हजार ९०० रुपयांची रोकड लंपास केली अशा प्रकारे एकाच दिवशी 45 लाख रूपये चोरट्यांनी पळवून नेले. याप्रकरणी नाशिकरोड तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच फॉरेन्सिक लॅबचे व श्‍वानपथक पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी एटीएमच्या बाजूस असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून बघितले असता दोन्ही घटना या बुधवारी (दि.२१) रोजी पहाटे च्या सुमारास झाल्याचे निदर्शनास आले आहे. इनोव्हा कारमधून आलेल्या चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने चोरी केल्याचे निदर्शनास आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्याप त्यांच्या हाती काही खराब सीसीटीव्ही फूटेजशिवाय काही हाती लागलेले नाही.

फोडलेली दोन्ही एटीएम कमी वर्दळीच्या ठिकाणी होती. दोन्ही ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात नव्हते, अंतर्गत इतर सुरक्षा व्यवस्था नव्हती, सीसीटीव्ही खराब दर्जाचे होते; तर हे एटीएम जुन्या पद्धतीचे असल्याने गॅस कटरने ठरावीक भागातून ते सहज तोडता येत असल्याने अवघ्या काही मिनिटात चोरट्यांनी ते फोडले. तसेच चोरट्यांनी एसबीआयच्या याच एटीएम मशीनला लक्ष्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

छुप्या पद्धतीचे कॅमेरे बसवावे
पोलिसांनी बँकांना एटीएमच्या सुरक्षेबाबत कडक निर्देश दिले आहेत. यामध्ये सर्व एटीएम केंद्रांमध्ये सुरक्षारक्षक तैनात करावेत, उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही एटीएम मशीन तसेच बाहेर व इतर छुप्या ठिकाणी लावावेत, आलाराम सिस्टिम लावावी, एटीएमशी छेडछाड होताच सतर्क करणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, यासह इतर सूचना केल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!