Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

इलेक्ट्रिक बसेससाठी २७ कोटी; अवजड उद्योग मंत्रालयाकडून मनपास पत्र

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेकडून आता शहर बससेवा सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू असतानाच केंद्र शासनाच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत महापालिका ५० इलेक्ट्रीक बस मिळणार आहे. याचसंदर्भात केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडून इले. बस खरेदीसाठी २७.५० कोटींचा निधी मंजूर झाला असून यासंदर्भातील पत्र नुकतेच महापालिकेला प्राप्त झाले आहे.

नाशिक महापालिकेच्या वतीने सक्षम व शाश्‍वत शहर बससेवा सुरू करण्यासाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट तत्वावर शहर बससेवा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून याकडे पाहिले जात आहे. यात सीएनजी, इलेक्ट्रक व डिझेल अशा ४०० बसेस चालविण्यासंदर्भात प्रति कि. मी. दराने निविदा मागविण्यात आल्या आहे.

याच पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाच्या फेम इंडिया योजनेतून नाशिक महापालिकेला ५० इलेक्ट्रीक बसेसला मान्यता मिळाली आहे. यानंतर केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडून पन्नास इलेक्ट्रीक बसेस खरेदीसाठी २७.५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यासंदर्भातील या मंत्रालयाचे पत्र महापालिकेला नुकतेच मिळाले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने महापालिकेला हा निधी मंजूर करताना काही अटी घातल्या आहे. या बसेस ठेकेदार एजन्सीला दिल्यानंतर दहा वर्षांत ७ लाख किलोमीटर धावल्या पाहिजे, यासह काही इतर अटी घातल्या आहे. या पत्रानुसार येत्या १५ नोव्हेंबर २०१९ पूर्वी या बसेसची खरेदी प्रक्रिया करावी लागणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!