Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

गोदाकाठी महायुतीचा झंझावाती प्रचार

Share

सायखेडा । वार्ताहर

निफाड विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आ,अनिल कदम यांनी गोदाकाठ भागात प्रचारात आघाडी घेतली असून शिंगवे चापडगाव, भुसे या गावात त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी कदम यांना मायमाऊलींचे आशीर्वाद मिळत आहेत. सुवासिनी अनेक ठिकाणी औक्षण करून विजयी होण्यासाठी आशीर्वाद देत आहेत.

शिंगवे येथे शिंगवे फाटा ते गाव रस्ता, स्मशानभूमीची कामे, सभांडप, हायमास्ट, असे विविध विकास कामे केली असल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे ङ्गदुपारी भुसे येथे झालेल्या सभेत आ, कदम म्हणाले की मतदार संघात एकमेव विकासाचा मुद्दा घेऊन आपण केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहे,

राजकारण विकासाचे केले पाहिजे आणि ते केल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे निराधार आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे मात्र जनता सुज्ञ आहे विकास लोकांना दिसत आहे आगामी काळात निफाडचा विकासाचा आलेख असाच उंचावत रहाण्यासाठी मतदार मतदान रुपी दान माझ्या पदरात टाकून मला विधानसभेत पाठविणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला,

यावेळी शहाजी डेर्ले, डॉ प्रल्हाद डेर्ले, विष्णूपंत डेर्ले, गोकुळ गीते, चिंतामण सोनवणे, ज्ञानेश्वर पोटे, दिनकर पोटे, मधुकर कांडेकर, मनोहर दराडे, दत्तू भुसारे, दिलीप पोटे, अरुण घुगे, जगन कुटे, आदेश सानप , शिवनाथ कडभाने यांच्यासह शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!