Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

‘समृद्धी’साठी सहा हेक्टर भूसंपादनाचा अडथळा

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. जिल्ह्यात जवळपास भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकर्‍यांच्या विरोधामुळे ९.४३  हेक्टरच संपादन होणे बाकी होते. त्यापैकी ३.७०  हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात साडेबाराशे हेक्टर क्षेत्रापैकी ६  हेक्टर क्षेत्रचा संपादन रखडले आहे.

महाराष्ट्राची दोन टोके जोडणारा ७०१ किलोमीटर लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकर्‍यांशी समन्वय साधत भूसंपादनाचा प्रश्‍न सरकारने मार्गी लावला.

नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात झालेल्या विरोधानंतर सरकारने सरळ खरेदीने आणि बाजारभावाच्या पाचपट दराने जमिनींची खरेदी केली. त्यामुळे प्रकल्पासाठी शेतकर्‍यांचा विरोध मावळला व वेगाने जमीन संपादन प्रक्रिया झाली. शेतकर्‍यांनाही खरेदीच्या पुढच्या मिनिटातच पैसे खात्यात मिळाले. परंतु न्यायप्रविष्ठ प्रकरणे, घरगुती वाद यामुळे जिल्ह्यात साडेबारा हेक्टर क्षेत्र संपादन रखडले होते.

मात्र, उशिराने का होईना त्यातील ३.७०  हेक्टर क्षेत्राचे मूल्यांकन करून अहवालही सादर केल्याने आता अवघ्या ५ हेक्टर ७३ आर इतकेच क्षेत्राबाबत निर्णय होणे बाकी आहे. त्यामुळे पुढील एक-दोन बैठकीत प्रांताधिकारी स्तरावरून हा प्रश्‍नही सुटेल. त्यामुळे जिल्ह्यातील आवश्यक सर्वच जमीन राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात मिळेल.

विशेष म्हणजे इतर जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जमिनी ताब्यात येऊन कामालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे निश्‍चित वेळेतच प्रकल्पपूर्तीसाठी आता शासनाचे प्रयत्न सुरू झाल्याचेही यातून दिसून येत आहे. सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतून हा महामार्ग जात आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!