Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज

Share

नाशिक | प्रतिनिधी

शहरात शुक्रवारी ठिकठिकाणी कृष्ण मंदिरे व विविध मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. दरम्यान शनिवारी (दि. २४) गोपाळकाला आहे. यानिमित्त दहीहंडीसाठी शहरातील विविध संस्था, मंडळे सज्ज झाली आहेत. जन्माष्टमी निमित्त पंचवटीतील श्रीकृष्ण नगर येथे मोठ्या उत्साहात दहीहंडी महोत्सव साजरा केला जाणार आहे.

शहर व परिसरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमी निमित्त शुक्रवारी (दि. २३) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन मंदिरांवर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील राधाकृष्ण मंदिर, श्रीकृष्ण मंदिर व इस्कॉन मंदिरात भजन, किर्तन, प्रवचन असे कार्यक्रम झाले. मध्यरात्री बारा वाजता मंदिरांमध्ये जन्माष्टमी सोहळा झाला. ‘राधे कृष्ण, गोपाल कृष्ण’चा भाविकांनी गजर केला.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर व सांगली येथे महापुराने मोठी हानी झाली आहे. अनेक कुटुंबांचे संसार व घरे वाहून गेल्याने सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत शहरातील काही मित्र मंडळे व प्रतिष्ठानांनी यंदा दहीहडी महोत्सव साजरा न करण्याचे ठरविले आहे. यात राज्यातील बहुतांशी महत्त्वाच्या मंडळांनीही हा निर्णय घेतला आहे.

सिडकोतील सह्याद्रीनगर येथे श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट तसेच पंचवटीतील कृष्णनगर येथे दहीहंडी महोत्सवाचे आज (दि. २४) सायंकाळी आयोजन करण्यात आले आहे. अनेकदा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणारे तरुण थरावरून कोसळून जखमी होतात. यात फोडणार्‍याच्या जीवावरही बेतू शकते. २०१२ साली जवळजवळ २२५ गोविंदा जखमी झाले होते. यासाठी राज्य सरकारने काही नियम तयार केले.

त्यात २०१४ मध्ये राज्य शासनाने १२ वर्षाखालील मुलांनी दहीहंडीत सहभागी होऊ नये असे फर्मान काढले. यानंतर उच्च न्यायालयाने यासाठीची वयोमर्यदा कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असली पाहिजे. दहीहंडीत सहभागी होणार्‍या गोविंदाची वयाची १८ वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजेत.

त्यानंतर २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयान १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी होता येणार नाही, असे स्पष्ट केले. थरांवरच्या उंचीबाबतही आधी न्यायालयाने निर्बंध घातले होते, पण २०१७ मध्ये ते शिथील करण्यात आले.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी ते टांगले जाते. याल फोडण्याचा तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसर्‍याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोर्‍याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. हंडी फोडणार्‍या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते.

Leave a Comment

error: Content is protected !!