Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यातील पंचवीसपैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध

Share

नाशिक । प्रतिनिधी 

जिल्ह्यातील पंचवीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यापैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने तेथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. उर्वरित अठरा ग्रामपंचायतींसाठी ३१ ऑगस्टला मतदान होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर ते १३ डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित होणार्‍या सुमारे ३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १ ऑगस्ट रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

९ ते १६ ऑगस्टदरम्यान इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र मागवण्यात आली होती. १९ ऑगस्टला प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. २१ ऑगस्टपर्यंत माघारीची मुदत होती. या कालावधीत अर्ज माघारी घेतल्याने सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यात नाशिक तालुक्यातील शिवणगाव व संसारी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

बागलाण तालुक्यातील विसापूर, कपालेश्‍वर, तुंगणदिगर, मालेगावमधील सातमाने, बेळगाव, दुंधे यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता नाशिकमधील २, बागलाणमधील ८, निफाडमधील १, येवल्यातील ४ आणि मालेगाव तालुक्यातील ३ अशा १८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला प्रारंभ होईल. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालेल, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!