Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

रामदास चारोस्कर आज शिवसेनेत

Share

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी-पेठ तालुक्याचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांचा शिवसेनेत प्रवेश निश्‍चित झाला असून आज  शुक्रवारी सकाळी ११ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चारोस्कर शिवबंधन बांधणार आहेत.

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ राखीव असून या मतदारसंघात सध्या आ. नरहरी झिरवाळ यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी शिवसेनेने मोट बांधली असून याअगोदर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत गेलेले धनराज महाले यांना संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख सतीश देशमुख यांनी शिवसेनेत आणले आहे.

आता रामदास चारोस्कर यांनाही शिवसेनेत आणण्यात आले आहे.
चारोस्कर यांच्याबरोबर दिंडोरी नगरपंचायतीचे समर्थक नगरसेवक, पं. स. सदस्य, दिंडोरी-पेठ तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच, अनेक काँग्रेसचे लोकप्रतिनिधी शिवबंधन बांधून चारोस्कर यांची ताकद दाखवून देणार आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!