Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज

Share

नाशिक । प्रतिनिधी

गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट वीजदराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत असून मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहनही महावितरणने केले आहे.

सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलिंग) आकार असे वीजदर आहेत. परिणामी अधिक वीज वापरली तरीही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट एवढाच दर आकारण्यात येईल. वीजभार ०.६ किव्होकरिता एक हजार रुपये वीजजोडणी खर्च आकारण्यात येईल.

मंडळाच्या वीजभारानुसार सुरक्षा ठेव रक्‍कम आकारण्यात येईल. उत्सव संपल्यानंतर ही रक्‍कम मंडळाच्या खात्यात महावितरणकडून ऑनलाईनद्वारे परतावा करण्यात येईल. मंडळाने सुरक्षिततेच्या जबाबदारीबाबत स्वत:चे प्रमाणपत्र (सेल्फ सर्टिफिकेशन), बँक खात्याची माहिती, मोबाईल क्रमांक देणे गरजेचे आहे.

पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी, मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!